नैरोबीत विमान दुर्घटनेत १५७ लोक दगावल्याची भिती

नैरोबी : वृत्तसंस्था- केनीयामध्ये एक इथियोपियन एअरलायन्सचे एक विमान आज सकाळी दुर्घटनाग्रस्त झाले. याची माहिती पंतप्रधान अबी अहमद यांनी ट्वीट करुन दिली आहे. इथियोपियन एअरलायन्सचे नवे बोईंग ७३७ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या सहा मिनीटात क्रॅश झाले. यावेळी विमानात १५७ प्रवाशी प्रवास करत होते. या प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात १४८ प्रवाशी आणि ९ क्रू मेंबर असे एकूण १५७ जण होते. पंतप्रधानांनी ट्वीट करुन हे स्पष्ट केले आहे की, हे विमान केनीयाच्या राजधानीकडे जात होते. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करुन त्यांच्या परिवाराच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे.