डॉल्बीमुक्त गणेशोत्सवातून वाचलेले पैसे सीसीटीव्हीसाठी द्यावेत : विश्वास नांगरे-पाटील

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन 

गणेशोत्सावात चोरीचे अनेक गुन्हे घडत असतात. अशा गुन्ह्यांना आळा घालण्याची गरज आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळेही सहकार्य करू शकतात. यावर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या डॉल्बीमुक्त गणेशोत्सवातून मंडळांच्या खर्चाची बचत होणार असून हे वाचलेले पैसे सीसीटीव्हीसाठी वापरल्यास उत्सवातील गुन्हेगारीला आळा घालण्यास यश येईल. मंडळांनी हे वाचलेले पैसे सीसीटीव्हीसाठी द्यावेत, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’537a45be-b0ed-11e8-951f-190312d4dd50′]

पोलिसांच्या वर्दीमध्येही एक गणेशभक्त आहे. मात्र उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना कठोर व्हावे लागते. कायद्याची बंधने पाळत गणेशोत्सव, मोहरम साजरा करण्यात यावा. यावर्षी मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करून त्यातून वाचलेले पैसे सीसीटीव्हींसाठी द्यावेत. असे आवाहन गणेशोत्सव मंडळांना करताना नांगरे-पाटील म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील महिला, मुली, युवती, वृद्ध देखावे पाहण्यासाठी बाहेर पडतात. अशावेळी चेन स्नॅचिंग, छेडछाडीच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्याशिवाय उत्सव काळाव्यतिरिक्तही मंडळाच्या परिसरात शांतता रहावी यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. महिला, मुलींना सुरक्षित वाटावे असे वातावरण उत्सव काळात रहावे. त्यामुळेच प्रत्येक घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीची आवश्यकता आहे. यासाठी मंडळांनी पुढे आले पहिजे. गणेशोत्सव मंडळांनी किमान मंडळाच्या परिसरात तरी सीसीटीव्ही बसवावेत. त्याचे कनेक्शन पोलिस मुख्यालयात देण्यात येईल. उत्सव काळात दारू पिऊन दंगा करणाऱ्यांची संख्याही अधिक असते. त्यामुळे अशा लोकांवरही कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.