बेकायदेशीर मद्याच्या साठ्यावर उत्पादन शुल्क विभागाचा छापा; गोवा बनावटीची 12.5 लाखांची दारू केली जप्त, तिघांना अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   सांगलीतल्या १०० फुटी परिसरातील शामरावनगर मध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी पर्दाफाश केला. गोवा बनावटीचे व राज्यात बंदी असलेली एकूण १२ लाख ६५ हजारांची दारू यावेळी हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने तिघांना अटक केली आहे. संजयकुमार व्यंकाप्पा शेरगे (वय 27), मेहबूब अब्दुल पिरखान (वय 27) आणि आतिश शरद सरोदे (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत बेकायदेशीर मद्याची विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे प्रभारी निरिक्षक संजय वाडेकर यांना माहिती मिळाली कि, शामरावनगर येथील सिद्धी विनायक चौक येथे लॉकडाऊनच्या कालावधीत चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने परराज्यातील गोवा बनावटीच्या दारूचा साठा करून विक्री होत आल्याची माहिती मिळाली. त्या प्रमाणे सदर ठिकाणी भरारी पथकांने छापा टाकला असता एक महिंद्रा पिकअप गाडी, एक कार व स्कोडा कंपनीची फाबिया कार तसेच त्यातील गोवा बनावटीचे व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले मॅकडॉल नं 1, इम्पेरीयल ब्लू, रॉयल स्टॅग, ब्लेंडर प्राईड अशा विविध ब्रान्डच्या 757 बाटल्या, किंग फिशर बीअर, टूबर्ग बीअरच्या 123 असा एकूण 12 लाख 64 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संजयकुमार व्यंकाप्पा शेरगे, मेहबूब अब्दुल पिरखान, आतिश शरद सरोदे अशा तिघा संशयितांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. सदर कारवाई प्रभारी निरीक्षक एस. एम वाडेकर, डॉ. उमा पाटील, स.दु. नि. संतोष थोरात, जवान श्रीपाद पाटील, संतोष बिराजदार, जयसिंग पावरा, पी एस बिरुणगी, अर्जुन कोरवी यांनी केली.