गेट ट्रेनिंग : जाणून घ्या मांसपेशी मजबूत करणार्‍या या फिजिकल थेरेपी विषयी

पोलिसनामा ऑनलाईन – अनेकदा काही अशी परिस्थिती असते ज्यामध्ये चालण्यात समस्या येते, जसे की, एखादा आजार, अपघात इत्यादी. ही समस्या मुलांमध्ये सुद्धा होऊ शकते. असे अनेकदा जन्माच्या वेळी होणार्‍या विकारांमुळे सुद्धा होते. अशावेळी आपली चालण्या-फिरण्याची क्षमता पुन्हा मिळवणे, संतुलन सुधारणे आणि चालताना चाल आणि गती योग्य बनवण्यासाठी काही फिजिकल थेरेपीजची आवश्यकता असते. जर जखमी झाल्याने किंवा एखाद्या आजारामुळे तुम्ही चालण्यास सक्षम नसाल तर डॉक्टर सुद्धा काही व्यायाम करण्याचा सल्ला देऊ शकतात. याच फिजिकल थेरेपी पैकी एक आहे गेट ट्रेनिंग (gait training).

या गेट ट्रेनिंग एक्सरसाइज मांसपेशी मजबूत बनवणे, पोस्चर सुधारणे आणि मसल मेमरीच्या विकासासाठी बनवले आहे. हे टेनिंग सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक आहे.

गेट ट्रेनिंगचे लाभ
* मांसपेशियों आणि सांधे मजबूत करणे
* संतुलन आणि पोस्चर सुधारणे
* सहनशक्ती वाढवणे.
* मसल मेमरी विकसित करणे.
* पडण्याची जोखिम कमी करणे. मोबिलिटी वाढवणे.
* आजाराची जोखिम कमी करणे.

गेट ट्रेनिंग केव्हा लाभदायक?
* पाय किंवा पेल्विस तुटल्यास
* स्ट्रोक्स
* मस्कुलर डिस्ट्रॉफी
* मुस्कुलोस्केलेटल डिसऑर्डर्स आणि समस्या

गेट ट्रेनिंग एक्सरसाइज
* ट्रेडमिलवर चालणे
* पाय वर उचलणे
* खाली बसणे आणि वर उठणे
* वस्तूंच्या वर पाय ठेवणे