स्थायीची ३६ कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता 

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाइन

रावेत येथील जलउपसा केंद्राची क्षमता वाढविण्यासाठीच्या कामांसाठी ४ कोटी ५८ वाख  ३ हजार ८८७ रुपये खर्चासह सुमारे ३६ कोटी ३५ लाख ८८ हजार रुपये खर्चाच्या कामांना स्थायी समितीच्या सभेत बुधवारी (दि.९) मान्यता देण्यात आली.

स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या सभेत रावेत येथील जलउपसा केंद्राची क्षमता वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग संपुर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी रावेत येथे पवना नदीवर जलउपसा केंद्र आहे. रावेत जलउपसा केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येथील टप्पा ३ व ४ योजनेअंतर्गंत स्ट्रण्डबाय पंपसेट बसविणे आणि अनुशंगिक कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या कामासाठी ४ कोटी ५८ वाख  ३ हजार ८८७ रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

पिंपरी-चिचवड शहरासाठी पार्कीग धोरण अवलंबविण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासनाने हे पार्कीग धोरण महानगरपालिका सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना स्थायी समितीने दिल्या आहेत.