कामाची गोष्ट ! तुमची कोणतीही क्रेडिट ‘हिस्ट्री’ नाही अन् क्रडिट स्कोअर 0 आहे, तरीसुद्धा मिळेल Loan, जाणून घ्या

नवी दिल्ली : क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो कर्जदाराने भूतकाळात केलेल्या क्रेडिट व्यवहाराच्या आधारावर क्रेडिट स्कोअर जारी करते, ज्यामध्ये आर्थिक संस्थांना ग्राहक डिफॉल्ट असण्याच्या शक्यतेबाबत समजते. क्रेडिट स्कोअर विविध मापदंडांच्या मदतीने सॉफ्टवेयर द्वारे तयार केला जातो. ज्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त असतो, त्यास कर्ज देण्यात बँकांना सोपे जाते.

क्रेडिट हिस्ट्री नसणारी व्यक्तीही घेऊ शकते कर्ज
क्रेडिट स्कोअर बँकांसाठी कर्जदारांना कर्ज देण्यावर विचार करण्याच्या दिशेने एक प्रथम बिंदू आहे, परंतु हा एकमात्र मापदंड नाही, ज्यास पाहून बँका कर्ज देतात. म्हणून जर तुमची कोणतीही क्रेडिट हिस्ट्री नसेल, तरीसुद्धा तुम्ही होम लोन घेऊ शकता, परंतु तुम्हाला बँकेला जास्त कागदपत्र द्यावे लागतील, ज्याद्वारे बँक वेळेवर ईएमआय भरणा करण्याची तुमची क्षमता आणि हेतू याबाबत समाधानी होऊ शकते.

हेतू आणि क्षमता अशी ठरवू शकतात
क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो 2005 च्यानंतर अस्तित्वात आले आहे, परंतु बँका अनेक दशकांपासून कर्ज देत आहेत. यासाठी कर्जदाराकडे क्रेडिट हिस्ट्री नसेल, तर तो सुद्धा होम लोन घेऊ शकतो. यासाठी इतर मापदंडांचा आधार घेतला जातो.

बँक या गोष्टी तपासू शकते

* अशा स्थितीत शैक्षणिक योग्यता आणि जॉब प्रोफाइल हे बँकेडून वापरण्यात येणारे महत्वपूर्ण मानदंड आहेत.

* जर कुणी सरकारी नोकरी करत आहे. उच्च पदावर आहे, जसे की आयएएस किंवा आयपीएस आहे, तर त्यांना क्रेडिट हिस्ट्री नसतानाही होम लोन मिळू शकते.

* सरकारी नोकरी आहे, किंवा उच्च शैक्षणिक पात्रता आहे, तरी सुद्धा तुम्हाला होम लोन मिळू शकते. अशावेळी मागील काही वर्षांचे बँक स्टेटमेंट मागितले जाऊ शकते.

* बँक तुमच्या बँकिंग व्यवहाराची सुद्धा सविस्तर तपासणी करू शकते, हे जाणून घेण्यासाठी की, वीज बिल, मोबाईल बिल यासारख्या यूटिलिटी बिलांचा भरणा तुम्ही नियमितपणे करता किंवा नाही.

* जर तुम्ही भाडेकराराने राहात असाल, तर ते तुमच्या भाडे भरण्याची नियमितता व्हेरिफाय करू शकतात.

* बँक तुम्हाला अशा कोणत्याही व्यक्तीची गॅरंटी देण्यास सांगू शकते, ज्याची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल. हे काही वैकल्पिक मापदंड आहेत, ज्यांचा उपयोग नियमित क्रेडिट रिपोर्टच्या अभावात बँकेकडून केला जाऊ शकतो.