Palghar Fireworks Factory Blast | डहाणूमध्ये फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट, परिसर हादरला (व्हिडीओ)

पालघर : पोलीसनामा  ऑनलाइन – पालघरच्या (Palghar) डहाणू (Dahanu) तालुक्यातील डेहणे येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट (Palghar Fireworks Factory Blast ) झाला आहे. सकाळी 10 च्या सुमारास हा स्फोट (Blast) झाला. स्फोट एवढा भंयकर होता की आजुबाजूची गावेही मोठ्या प्रमाणात हादरली आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, सुमारे 5 ते 10 किलोमीटर परिसरातील घरांना मोठे धक्के जाणवले.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

डहाणू तालुक्यातील डेहणे येथील विशाल फटाका कंपनीत (Vishal Fireworks Company) भीषण स्फोट (explosion) झाला आहे. डहाणू हायवेपासून (Dahanu Highway) 15 किमी अंतरावर जंगलात (forest) ही कंपनी आहे. अचानक झालेल्या स्फोटाने आजूबाजूच्या 5 ते 10 किमी अंतरावरील घरांना मोठे धक्के जाणवले आहेत. स्फोटानंतर भीषण आग (Fire) लागली आहे. आगामुळे धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे.

फटका कंपनीत स्फोट कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप कळू शकली नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या (Fire engines) घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्थानिक पोलीस प्रशासन आणि गावकरी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

स्फोटात 10 जण भाजले

तहसीलदारांनी दिली की, स्फोटात दहा जण भाजले असून एक जण गंभीररीत्या जखमी आहे. जखमींना डहाणू आशागड (Dahanu Ashagad) येथील रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी संबंधित खात्यांचे अधिकारी घटनेची चौकशी करण्यासाठी दाखल झाल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : explosion at vishal fireworks company at dahanu palghar

हे हि वाचा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई;
भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

PF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! EPFO ने कोट्यवधी PF खातेधारकांना दिला दिलासा; दुसर्‍यांदा घेऊ शकतील अ‍ॅडव्हान्स

Nitesh Rane | नितेश राणेंनी सेनेला डिवचले; म्हणाले – ‘शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय’