धक्कादायक ! कुंभमेळयानंतर उत्तराखंडमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये तब्बल 1800 टक्क्यांनी वाढ

डेहराडून (उत्तराखंड) : वृत्तसंस्था –   उत्तराखंडमध्ये एप्रिल महिन्यात कोरोनामुळे कुंभमेळा महिनाभरच ठेवण्यात आला होता. मात्र बाधितांची संख्या वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतीकात्मक ठेवण्याची सूचना केली व ती मान्य झाली. पण तरीही प्रशासनाला वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला आवर घालता आला नाही. ही वाढ तब्बल १ हजार ८०० टक्के वाढली हे विशेष. गेल्या महिन्यात मृत्यूचे प्रमाणही वाढले. आता पर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी जवळपास निम्मे मृत्यू प्रतीकात्मक कुंभमेळ्यातील आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचे प्रमाण कुंभमेळ्यामुळेच वाढले अशी चर्चा सुरु झाली आहे.

राज्यात १ एप्रिल ते ७ मे यादरम्यान मोठ्या संख्येने रुग्ण वाढले. हि संख्या १ लाख ३० हजारावर गेली. ही संख्यादेखील राज्याच्या एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास निम्मी आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी १,७१३ मृत्यू हे १ एप्रिल ते ७ मेदरम्यानचे आहेत. तर आठ दिवसात ८०६ मृत्यू झाले आहेत. ७ मेला उत्तराखंडमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्यानऊ हजार ६४२ इतकी नोंदली गेली. त्यामुळे राज्यात बाधितांची संख्या २.२९ लाखांवर गेली आहे. उत्तराखंड सरकारने कुंभमेळ्यातील शेवटचे शाहीस्नान आटोपताच निर्बंधदेखील घातले.

दुसरी लाट कोणामुळे?

कोरोना भारतीय प्रकाराचा प्रसार सुरु झाल्याचे आपल्याला माहित होते. पण तरीही जानेवारीमध्ये आपण सगळ्यांनी गर्दी करणे, धार्मिक कार्यक्रम आखणे, लग्नसमारंभ करायला सुरुवात केली. त्यामुळे कोरोनाचे संकट गडद झाले. हे थाबवले असते तर आज हि परिस्थिती निर्माण झाली नसती असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमित सिंह यांनी सांगितले.