भारतात दहशवादी हल्ल्याचा कट; झाकीर नाईक आणि रोहिंग्या ‘कनेक्शन’

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – इस्लामी धर्मगुरु झाकीर नाईक आणि रोहिंग्या दहशतवादी संघटनांमध्ये झालेल्या दोन लाख डॉलर्सच्या व्यवहारानंतर मलेशियामध्ये भारतातील शहरांवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली.

रॉ (रिसर्च अनालिसिस विंग) कडून दिल्ली पोलिसांना दिलेल्या माहितींनुसार म्यानमारमधील महिलांना दहशतवादी हल्ल्यासंदर्भात ट्रेनिंग देण्यात आली आहे. येणाऱ्या पुढच्या काही आठवड्यांमध्ये अयोध्या, बोधगया, पंजाब आणि श्रीनगर या शहरांमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट आहे. दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त देशातील इतर महत्त्वाच्या शहरांतील पोलिसांनाही यासंदर्भात अधिक तपशील पाठवण्यात आले आहेत.

‘पीएफआय’कडूनही रोहिंग्या नेत्यांची मदत
झाकिर नाईक काही रोहिंग्या नेत्यांसोबत मिळून भारतातील काही शहरांवर हल्ला करण्याचा कट रचत आहे. यासाठी झाकिर नाईकच्या खात्यातून दोन लाख डॉलर्स ट्रान्सफर करण्यात आले आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतातील एक व्यापारी या कटामध्ये सहभागी असल्याची शंका उपस्थित केली जात असून एका महिला दहशतवाद्याचाही या कटामध्ये समावेश आहे. प्रजासत्ताकदिनापूर्वी (२६जानेवारी )हा हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असणार असल्याचीही माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, पीएफआयही या कटामध्ये सहभागी असून रोहिंग्यांना मदत करणार असल्याची माहितीही सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली आहे.