पुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मुंबई पुणे महामार्गावर चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून, एका परदेशी महिलेची सुटका केली आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जस्मीन एजंट, निलेश सुर्यकांत देशपांडे (वय-42), शिवा गोविंद महावीरसिंग तोमर (वय-26, दोघे रा.रा. वंडर फ्युचरा डुक्कर खिंड स.नं 71फ्लॅट नंबर- टी 303 मुंबई पुणे हायवे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी निलेश सुर्यकांत देशपांडे आणि शिवा गोविंद महावीरसिंग तोमर यांना घटनास्थळावरुन ताब्यात घेण्यात आले असून हे दोघेही वेश्या व्यावसाया संबंधीत गुन्ह्यातील रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. सदर कारवाईमध्ये रोख रक्कम 5 हजार व तीन मोबाईल फोन, पिडीत महिलेचा पासपोर्ट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.20) सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेचे पोलीस नाईक नितीन तेलंगे यांना आपल्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. आरोपी निलेश देशपांडे व त्याचा सहकारी शिवा गोविंद सिंग हा एजंट मार्फत परदेशी मुलींना मुंबई- पुणे महामार्गावर असलेल्या वंडर फ्युचरा डुक्कर खिंड स.नं 71फ्लॅट नंबर- टी 303 या ठिकाणी ठेवून वेश्या व्यावसाय करुन घेत आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने छापा टाकला असता उजबेकीस्थान या देशाच्या एका महिलेची वेश्या व्यावसायातून सुटका करुन तीला वेश्या व्यावसाय करण्यास प्रवृत्त करणारऱ्या लोकांना अटक केली. या प्रकरणातील आरोपी निलेश देशपांडे हा सन 2016 मध्ये वेश्या व्यावसाय व मोक्का अंतर्गत अटक असलेल्या एका महिलेचा दिर असून त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला मोबाईल हा अारोपी महिलेचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच दुसरा आरोपी शिवा तोमर हा हिंजवडी पोलीस ठाण्यात वेश्या व्यावसाया प्रकरणी हवा असलेला अारोपी आहे.

सदरची कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, गुन्हे-2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल भालेकर,कर्मचारी राजाराम घोगरे, नितीन तेलंगे, सचिन शिंदे, तुषार आल्हाट, सचिन कदम, प्रदिप शेलार, सुनिल नाईक, संदिप गोऱ्हे, महिला पोलीस कर्मचारी अनुराधा ठोंबरे, रुपाली चांदुगडे, सुप्रिया शेवाळे, सरस्वती कागणे, तसेच कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांच्या सहका-यांनी केली.