मार्क झुकेरबर्गने दिली चूक झाल्याची कबुली 

वॉशिंग्टन :

फेसबुकने खोटी माहिती व अफवांचा प्रसार रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या नव्हत्या, अशी कबुली फेसबुक संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे. याबाबत पुरेशी खबरदारी घेतली नव्हती ही माझी घोडचूक झाली, असे उद्गार मार्क झुकेरबर्गने युरोपियन युनियनच्या ब्रुसेल्स येथील मुख्यालयात काढले.

मार्क झुकेरबर्ग म्हणाले की, फेसबुकचा वापर दुसऱ्यांच्या बदनामीसाठीसाठी तसेच खोट्या बातम्या पेरण्यासाठी केला जाईल, असा विचार आम्ही केला नव्हता. फेसबुकवरील वापरकर्त्यांची माहिती चोरून तिच्या आधारे विविध देशांतील निवडणुकांमध्ये मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जाईल, असेही कधी वाटले नव्हते . याबाबत आम्ही सजग राहायला हवे होते.  ही माझ्याकडून झालेली घोडचूक आहे. ती सुधारण्यासाठी आता उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी डेटा चोरी प्रकरणी फेसबुकची जगभरात नाचक्की झाली होती. मार्क झुकरबर्गला जाहीर माफीही मागावी लागली होती.

जाहिरात

देशातील युवक २ कोटी नोकऱ्यांची वाट पाहात आहेत : डॉ. मनमोहन सिंग 

जाहिरात

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B07BCGC13F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b8995c78-b33f-11e8-b306-63f9708d99c4′]