फेसबुक मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा 

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था- गेल्या काही दिवसांपासून फेसबुकच्या मागे लागलेली  विघ्न कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. सोशल नेट्वर्किंग साईटसपैकी महत्वाच्या असणाऱ्या फेसबुक  मुख्यालयाच्या कॅम्पस परिसरात बाँम्ब असल्याची अफवा पसरली  होती.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार , मुख्यालयाच्या कॅम्पस कॅम्पस परिसरात बाँम्बच्या अफवेमुळे काही  इमारती खाली करण्यात आल्या आहेत तसेच परिसरात बॉम्ब शोधक पथक परिसरात दाखल झाले आहे. फेसबुक  मुख्यालयाच्या कॅम्पस परिसरातील सर्वजण  सुरक्षित असल्याची माहिती फेसबुक प्रवक्त्याने दिली आहे.

डेटा लीक प्रकरण –
जून्या मित्रमैत्रणींना शोधण्यापासून ते नवनविन मित्रमैत्रणी जोडण्यासाठी फेसबुक एक चांगले आणि प्रभावी माध्यम आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी डेटा चोरी प्रकरणी फेसबुकची जगभरात नाचक्की झाली होती. मार्क झुकरबर्गला जाहीर माफीही मागावी लागली होती.

जगभरात फेसबुक चे युजर्स जवळपास कोटींच्या घरात आहेत . इतर सोशल नेट्वर्किंग साईटसपैकी फेसबुक हे सर्वाधिक वापरले जाणारे सोशल माध्यम आहे.

पण डेटा लीक प्रकरणामुळे फेसबुकवर सध्या वाईट दिवस आलेत असे म्हणावे लागेल .  केंब्रिज अॅनालिटीकाच्या डेटा चोरी प्रकरणानंतर फेसबुक चांगलंच वादात सापडलं होते. हे प्रकरण शांत होते ना होते तोच फेसबुकसमोर आणखी एक मोठी अडचण उभी राहिली. फेसबुकच्या २ कोटी ९० लाख युजर्सचा डेटा हॅकर्सने चोरल्याची माहिती समोर आली होती.  सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही ५ कोटी अकाऊंटसची माहिती लीक झाली होती.