राज्यातील ‘या’ शहरात गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी कंडोमचा वापर झाला दुप्पट !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मुंबईत गर्भनिरोधक गोळ्याऐवजी कंडोमचा वापर दुप्पट झाल्याचं एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. देशातील एकूण 22 राज्यांत एक सर्व्हेक्षण केलंय. या सर्वेक्षणातून एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आलीय, ती म्हणजे, भारतामध्ये विवाहित जोडप्यांकडून होणारा गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर कमी झाला आहे, असे निदर्शनास आलंय.

देशातील एकूण 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधील शहरी भागामध्ये हे सर्वेक्षण केलंय. मुंबईमध्ये फॅमिली प्लॅनिंगसाठी गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी कंडोमचा वापर दुप्पट झाल्याचे समोर आलंय. तसेच गर्भनिरोधक गोळ्यांसोबत महिलांच्या नसबंदीच्या प्रमाणातही घट झालीय. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमधून ही बाब समोर आलीय.

जाणून घेऊया, मुंबईची आकडेवारी काय सांगते ?
मुंबईतील 10 पैकी 7 विवाहित जोडपी पहिल्यापासूनच कुटुंब नियोजनाच्या पद्धतीशी जोडले गेले आहेत. 2015-16 मध्ये कुटुंब नियोजन करणार्‍या जोडप्यांची संख्या 59.6 टक्के इतकी होती. तर, 2019-20 मध्ये हीच आकडेवारी वाढून 74.3 टक्के इतकी झालीय. याच दरम्यान, कंडोमचा वापर 11.7 टक्क्यांवरून वाढून 18.1 टक्के झालाय. गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचं प्रमाणही 3.1 टक्क्यांवरून कमी होऊन 1.9 टक्क्यांवर आलंय. महिला नसबंदीचं प्रमाण 47 टक्क्यांवरून कमी होत 36.1 टक्क्यांवर आलंय.

मुंबई उपनगरांतील आकडेवारी काय सांगते?
मुंबई उपनगरांमध्ये पुरुषांमध्ये कंडोमचा वापर हा दुप्पट झालाय. मुंबई उपनगरांमध्ये कंडोमचा वावर 2015- 16 मध्ये 8.9 टक्के होता, तो आता 2019-20 मध्ये वाढून 18 टक्क्यांवर गेलाय. मुंबई उपनगरांमध्ये महिला नसबंदी प्रमाण 43 टक्क्यांवरून 37.5 टक्क्यांवर आलंय. तर, गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचं प्रमाण 5.3 टक्क्यांवरून 0.9 टक्क्यांपर्यंत घसरलंय.