प्रख्यात संगीतकर ‘राम-लक्ष्मण’ जोडीमधील ‘लक्ष्मण’ विजय पाटील यांचे निधन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रख्यात संगीतकर राम लक्ष्मण जोडीमधील लक्ष्मण म्हणजे विजय पाटील यांचे आज नागपूरात निधन झाले. पाटील हे पॅरालिसिसच्या आजाराने त्रस्त होते. दादा कोंडके यांच्या पांडु हवालदार पासून त्यांच्या जवळपास सर्व चित्रपटांना या जोडगळीने संगीत दिले होते. या जोडीचे नामकरणही दादा कोंडके यांनी राम लक्ष्मण असे करुन टाकले होते.

विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रे असे या जोडगळीचे मुळ नाव होते. सुरेंद्र हेंद्रे यांच्या निधनानंतरही विजय पाटील यांनी राम लक्ष्मण हे नाव काम ठेवले होते.एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी या दोघांना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत़ तेवढेच दादा यांनी लक्षात ठेवले आणि त्यांचे नामकरण राम -लक्ष्मण करु टाकले होते.

राम लक्ष्मण यांनी हिंदी, मराठी व भोजपुरी अशा सुमारे ७५ चित्रपटांना संगीत दिले़ त्यातील पत्थर के फूल, हम आपके है कौन, हम साथ साथ है, हम से बढकर कौन अशा अनेक चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली़ दादा कोंडके यांच्या पांडु हवालदारपासून अनेक चित्रपटांची गाणी गाजली आहेती. दादा कोंडके यांच्याप्रमाणेच राजश्री प्रोडक्शनच्या बहुतेक चित्रपटांना राम लक्ष्मण यांनी संगीत दिले आहे़ १९७७ मध्ये एजंट विनोदपासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली.

या जोडगळीला १९९० मध्ये फिल्मफेअरचे सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता़ मैने प्यार किया या चित्रपटातील गीतांसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. यात सलमान खान यांच्या आवाजासाठी त्यांनी दक्षिणेतील एस. पी. बाल सुब्रमण्यम यांचा आवाज वापरला होता. त्याचबरोबर लता मंगेशकर यांच्या दुसर्‍या टप्प्याची सुरुवात या चित्रपटापासून झाली होती.