Photos : लहान पडद्यावरील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करणार Digital Debut ! अनेकदा शेअर केलाय बोल्ड बिकिनी लुक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – करिअरच्या सुरुवातीच्या काळात मॉडेलिंग करणारी लहान पडद्यावरील अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif) लवकरच आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. आमना शरीफ लवकरच डिमांड 3 या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. सीरिजच्या पहिल्या 2 सीजनमध्ये अ‍ॅक्ट्रेस अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत होती. दोन्ही सीजन हिट झाले आहेत. आता तिसरा सीजन येणार असून त्यात आमनाला संधी मिळाली आहे.

आमनानं लहान पडद्यावरील आपल्या अभिनयानं खूप अटेंशन घेतलं आहे. तिनं बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. पहिल्यांदाच ती आता ओटीटीवर दिसणार आहे. आता सायकॉलॉजिकल क्राईम ड्रामात काम करण्यासाठी ती खूप उत्सुक झाली आहे. आमना सोशलवर कायमच सक्रिय असते आणि चाहत्यांशी संपर्क करत असते.

आमनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कभी तो होगा या मालिकेतून तिनं टीव्हीवरील अभिनयाला सुरुवात केली होती. एक खलनायक, आलू चाट अशा बॉलिवूड सिनेमातही तिनं काम केलं आहे. लग्न झाल्यानंतर अनेक वर्षे ती अभिनयापासून दूर होती. कसौटी जिंदगी की 2 या मालिकेतून तिनं लहान पडद्यावर कमबॅक केलं होतं. आता लवकरच ती डिमांड 3 या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. हा तिचा डिजिटल डेब्यू आहे.