विकी कौशलसाठी सामोसा आणि जिलेबी घेऊन एअरपोर्टवर आली चाहती !

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड सेलेब्ससाठी चाहते काय करतील हे काही सांगता येत नाही. आवडत्या स्टारला भेटण्यासाठी ते काहीही करू शकतात. असंच काहीसं बॉलिवूड अ‍ॅक्टर विकी कौशल (Vicky Kaushal) सोबत घडल्याचं दिसून आलं. आज जेव्हा विकी एअरपोर्टवरून रवाना होत होता तेव्हा त्याला अशी एक फॅन भेटली जी त्याच्यासाठी सामोसा आणि जिलेबी घेऊन आली होती. त्यालाही खूप छान वाटलं. विकीनं सामोसा खाताना एक फोटो पोस्ट करत लिहिलं की, म्हटलं होतं खाऊ शकणार नाही, परंतु राहवलं नाही.

विकीनं त्याच्या इंस्टावरून ही पोस्ट शेअर केली आहे. यात तो लिहितो की, हर्षिता सारखी फॅन भेटल्यानं आनंदित आहे, जिला माहित होतं की, मी भुकेला आहे. मम्मी पप्पाला न सांगता एअरपोर्टवर आली होती, सोबत सामोसा जिलेबी आणली होती. आंटी, अंकल रागावू नका. जर वाचत असाल तर खूप सारं प्रेम. इंदोरचे सामोसे कमाल आहेत.

विकी सोबत माजी ब्युटी क्वीन मानुषी छिल्लर देखील होती, जी मध्य प्रदेशातील महेश्वरला जात होती, तिथं तिच्या आगामी सिनेमाची शुटींग आहे.

विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो शुजित सरकारच्या सरदार उधम सिंह या सिनेमात काम करणार आहे. याशिवाय तो करण जोहरच्या तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. तो शेवटचा भूत पार्ट वन : द हॉन्टेड शिप या सिनेमा सिनेमात दिसला होता.