अबब… नांदेड जिल्ह्यात चक्क गांजाची शेती ; २ कोटीचा गांजा जप्त

किनवट : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – किनवट तालुक्यातील रामपूर – पोतरेड्डी शिवारात चक्क गांजाची शेती करणाऱ्या १९ जणाना अटक करण्यात आले आहे. ३ आठवड्यांपुर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार होते. अखेर त्यांना बुधवारी (दि. २६) अटक करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की किनवट तालुक्यातील रामपूर-पोतरेड्डी शिवारात काहीजण गांजाची शेती करत असल्याचे पोलीसांना समजले. त्यानंतर पोलीसांनी तपास करुन सव्वादोन कोटींचा गांजा जप्त केला होता. तसेच गांजाची शेती करणाऱ्या १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सर्व १९ आरोपी फरार झाले होते. त्यांना बुधवारी (दि.२६) रात्री पोतरेड्डी – घनपूर घाटातील घनदाट जंगलातून अटक केली.

सजनसिंग तारासिंग साबळे, गोपाल सरचंद पडवळ, गोविंदसिंग चंदू पडवळ, जयराम तिमा टाकडा, मारूती सटवाजी दुधाडे, अनंतराव जंगले, मोरसिंग भाऊसिंग साबळे, जयराम नरहरी गदाई, सदु काशीराम साबळे, शंकरभान शिवराम टाकडा, नारायण रामचंद्र मठावण, संतोष रामचंद्र खसावत, सुरजभान शिवराम टाकडा, प्रशांत ज्ञानेश्वर शिकारे, प्रल्हाद माधवराव वाघाळे, बालसिंग हुशारसिंग पडवळ, प्रतापसिंह चंदरसिंह गदाई, गुलाबसिंग डोंगरे (सर्व रा.पोतरेड्डी), ईश्वरसिंग साबळे ह.मु.हातनूर जि.आदिलाबाद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटकेतील सर्व आरोपींना गुरुवारी नांदेडच्या विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप तिडके व त्यांच्या पथकाने केली.