Fatima Sana Shaikh | फातिमा शेख हिचा आमिर खान नाही तर ‘हा’ आहे आवडता अभिनेता

पोलीसनामा ऑनलाइन – दंगल चित्रपटातील धाकड गर्ल अर्थात अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) ही नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिने बॉलीवुडमध्ये दंगल याच चित्रपटातून पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात तिने प्रेक्षकांची मने जिंकली. फातिमा ही तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. दंगल सिनेमानंतर फातिमा सना शेख व अभिनेता आमिर खान सोबत अफेअर (Fatima And Aamir Khan Affair) असल्याच्या चर्चांना उधाण आले. अनेकदा त्यांचे एकत्रित असणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या फातिमाने (Fatima Sana Shaikh) तिच्या आवडत्या अभिनेत्याचे नाव जाहीर केले आहे. यामुळे ती पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे.

अभिनेत्री फातिमा सना शेख व आमिर खान (Aamir Khan) यांचे नाव अनेकदा जोडण्यात आले आहे. मात्र एका मुलाखतीमध्ये फातिमाने तिचा आवडता अभिनेता आमिर नसून दुसराच खान असल्याचे सांगितले आहे. तिचे हे उत्तर ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री फातिमा सना शेख हिने सांगितले की तिचा बॉलीवुडचा फेवरेट अभिनेता बॉलीवुडचा किंग खान (Bollywood King Khan) आहे. तिला शाहरुख खान की आमिर खान कोण आवडते असा प्रश्न करण्यात आला होता. सर्वांना ती आमिर खान नाव घेईल असे वाटले होते. मात्र फातिमाने शाहरुख खानची (Shah Rukh Khan) निवड केली.

अभिनेत्री फातिमा सना शेख म्हणाली की, ”शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे. मात्र आमिर खानने ‘रंग दे बसंती’ (Rang De Basanti), ‘पीके’ (‘PK), ‘पीपली लाइव’ (Peepli Live) सारखे एका पेक्षा एक सिनेमा सिनेसृष्टीला दिले आहेत आणि हे सगळे सिनेमा वेग-वेगळे आहेत.” असे उत्तर अभिनेत्री फातिमाने दिले आहे. तिचा आवडता हिरो हा आमिर नसून शाहरुख असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) ही लवकरच बिग बजेट चित्रपटांमध्ये झळकणार (Fatima Upcoming Movie) आहे. फातिमा सना खान ही मेघना गुलजार (Meghna Gulzar) यांच्या ‘सॅम बहादुर’ या चित्रपटातून (Sam Bahadur Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये ती अभिनेता विकी कौशल सोबत काम करणार आहे. तसेच ती अनुराग बसूच्या (Anurag Basu) ‘मेट्रो इन दिनों’ (Metro In Dino ) या सिनेमात झळकणार आहे. याचबरोबर ती ‘फिलहाल’ (Filhal) या सिनेमामध्ये देखील काम करणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘PM Modi always supported Pune’s development,’ Ajit Pawar lauds PM’s cooperation

Pune: Indian Bank appeals to customers to get their accounts activated

Pune: Chhatrapati Shivaji Maharaj carried out the first surgical strike, says Sharad Pawar

How Apple’s Decision to Allow Third-Party App Sideloading on the iPhone Could Transform the App Ecosystem

Nora Fatehi | नोराच्या रिव्हिलिंग जीन्सने नेटकरी घायाळ; फोटो व्हायरल

ACB Trap News | आरोग्य निरीक्षक व पाणी पुरवठा अभियंता लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune District Chemist Association Elects New Leadership, Jagannath Shinde Emphasizes Unity and Vision for the Profession

Central Railway Prepares Monsoon Measures for Safe Rail Travel on Pune-Mumbai Route