पुणेकरांसाठी 9 फेब्रुवारी ठरतोय खास थंडीचा

पुणे : पुणेकरांना गेल्या काही वर्षांमध्ये ९ फेबुवारी हा दिवस खास ठरु लागला आहे. गेल्या १० वर्षांपैकी निम्म्या म्हणजे ५ वर्षात फेब्रुवारीमधील सर्वात कमी किमान तापमान हे ९ फेब्रुवारी रोजी नोंदविले गेल्याचे दिसून येत आहे.

आज ९ फेब्रुवारी रोजी पुण्यात आतापर्यंतचा सर्वात कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या १० वर्षातील यापूर्वी ९ फेब्रुवारी २०१२ रोजी ४.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०१९ मध्ये ५.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. ९ फेब्रुवारी २०१६ रोजी ८.७ अंश आणि ९ फेब्रुवारी २०१५ रोजी ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. हे पहाता पुणेकरांसाठी ९ फेब्रुवारी हा खास थंडीचा दिवस ठरत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात फेब्रुवारीमध्ये सर्वात कमी किमान तापमान १ फेब्रुवारी १९३४ मध्ये ३.९ अंश सेल्सिअस नोेंद झाली होती.