Coronavirus : … म्हणून महिलांच्या तुलनेत पुरूषांसाठी जास्त जीवघेणा ठरतोय ‘कोरोना’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – अनेक संशोधनातून समोर आलेल्या अहवालात महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा संसर्ग अधिक घातक असल्याचं दिसून आलं आहे. त्यासाठी सुरुवातीस मेल हर्मोन्स टेस्टोस्टेरॉन हे कारण उघडकीस आले होते. आता नवीन संशोधनानुसार क्रोमोसोम्स, एसीई२ प्रोटिन्स आणि दैनंदिन जीवनातील काही गोष्टींबाबत खुलासा केला आहे. फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

एसीई-२ रिसेप्टर्स

कोरोना संसर्गाचा मानवी शरीरावर पडणार प्रभाव याबाबत संशोधन सुरु असून, तज्ज्ञांच्या चंपुने यामागची अनेक कारणे शोधून काढली आहेत. त्यामध्ये पुरुषांच्या शरीरात कोरोनाचा प्रसार जलद गतीने का होतो यासंदर्भात माहिती मिळाली आहे. यामधील मुख्य कारण म्हणजे एसीई२ रिसेप्टर्स, हे रिसेप्टर्स एका प्रकारचे प्रोटिन्स असतात. या प्रोटिन्सना नियंत्रणात आणल्यानंतर कोरोनाचा संसर्ग जलद गतीने शरीरात होतो. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये रिसेप्टर्स चे प्रमाण अधिक असते.

तसेच हार्ट अटॅक अथवा डायबिटीजची समस्या असलेल्या लोकांच्या शरीरात एसीई२ रिसेप्टर्स जास्त प्रमाणात असेल तर त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाची वाढ होणाऱ्या रुग्णांना डायबिटीस आणि हृदयसंबंधी आजार असलेल्यांची संख्या अधिक आहे.

हार्मोन्सची भूमिका

ज्या पुरुषांना कोरोनाचा संसर्ग जलद होण्याचा कारण त्यांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची कमतरता असते. या हार्मोन मुळे शरीरात संसर्गाचा प्रवेश झाल्यास फुफ्फुसांना आणि शरीराच्या काही भागांना सूज येण्यापासून रोखता येऊ शकते. तसेच धूम्रपान करणे, अल्कोहोलच सेवन करणे आणि चुकीची जीवनशैली यामुळे महामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन संसर्गाचा सामना करणे कठीण होऊन जात.

क्रोमोसोम्स

महिलांच्या शरीरात XX क्रोमोसोम्स असते. पुरुषांच्या शरीरात XY क्रोमोसोम्स असतात. क्रोमोसोम्सवर लिंगाचे निर्धारण आधारित असते. अलीकडे करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आलं की हे क्रोमोसोम्स रोगप्रतिकारशक्तीला प्रभावित करतात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी XX क्रोमोसोम्स जास्त परिणामकारक ठरतात.