Female Police Suicide | महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – Female Police Suicide | जुने शहर पोलीस ठाण्याच्या (Old City Police Station Akola) हद्दीतील गीता नगर येथे राहणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने घरातील पंख्याला गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.16) दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत जुने शहर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वृषाली दादाराव स्वर्गे Vrishali Dadarao Swarge (वय-45) असे आत्महत्या करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Female Police Suicide)

वृषाली स्वर्गे सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात (City Kotwali Police Station) कार्यरत होत्या. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांना मुलबाळ नव्हते. वृषाली यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत त्यांनी जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी बुधवारी सकाळी राहत्या घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन चिठ्ठी जप्त केली आहे. (Female Police Suicide)

वृषाली यांच्या घराचा दरवाजा मंगळवार (दि.15) पासून बंद होता.
दोन दिवसांपासून त्या दिसल्या नसल्यामुळे अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी घराचा दरवाजा वाजवला.
मात्र, आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे संयश बळावला.
याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मात्र, दरवाजा आतून बंद असल्यामुळे आत कसे जायचे असा प्रश्न पोलिसांसमोर होता.
अखेर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी वृषाली यांचा
मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI Pilot Project | आरबीआय कडून कर्ज मिळणे होणार अधिक सुखकर; सुरु करणार नवीन पब्लिक टेक प्लॅटफॉर्म असणारा पायलट प्रोजेक्ट

MNS Chief Raj Thackeray | ‘जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत, ह्यांनी कोव्हीड पण…’ राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

New Housing Scheme | शहरामध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या लोकांना घेता येणार हक्काचे घर; पंतप्रधान मोदींनी केली नवीन योजना घोषित