‘त्या’ महिला सामाजिक कार्यकर्तीला नोकरीवरून काढले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिका निवडणूक लढविणे, बेशिस्तीचे वर्तन केल्याप्रकरणी जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातील पर्यवेक्षिका तथा सामाजिक कार्यकर्ता मंगल भुजबळ यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

या महिला सामाजिक कार्यकर्त्यावरून नगर शहरातील वातावरण चांगलेच पेटले होते. त्यांची दुसऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांसोबत भांडण झाले होते. त्यामुळे दोघींनी एकमेकींविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तसेच मंगल भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्मिता अष्टेकर आल्या होता. त्यावेळी दोन्हीमध्ये पत्रकार परिषदेतच चांगलेच भांडण झाले होते. मंगल भुजबळ हे शासकीय सेवेत असताना तिने महापालिका निवडणूक लढविली, अशी तक्रार स्मिता अष्टेकर व रेखा जरे यांनी केली होती. त्या तक्रारीची प्रशासकीय पातळीवर चौकशी करण्यात आली.

चौकशीनंतर पर्यवेक्षिका मंगल भुजबळ हिने अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिची जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातील पर्यवेक्षक म्हणून सेवा संपुष्टात आणण्यात आली आहे. काल तिच्यावरही तडकाफडकी कारवाई करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –