तुरळक हिंदू नेते मला प्रचारासाठी बोलावतात : गुलाम नबी आझाद

लखनऊ :  वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी ‘गेल्या चार वर्षांपासून काँग्रेसमधील हिंदू नेते मला प्रचारासाठी बोलावत नाहीत असे वक्तव्य अलीगड मुस्लिम विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांच्या एका संमेलनात केले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f4deb3f0-d36a-11e8-8715-73b3255190a3′]

याबाबत अधिक माहिती अशी की, अलीगड मुस्लिम विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांचे सम्मेलन आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना आमंत्रित केले होते, यादरम्यान बोलतांना ते म्हणाले ‘मी युवक काँग्रेसचा नेता असल्यापासून काँग्रेसच्या विविध निवडणुकांसाठी प्रचार करतो आहे. त्या काळात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक नेते मला प्रचार करायला बोलवायचे. बोलवणाऱ्यांमध्ये हिंदूंचे प्रमाण ९५ टक्के तर मुसलमानांचे प्रमाण ५ टक्के होते. आता फारच तुरळक हिंदू नेते मला  प्रचारासाठी बोलावतात.

अबब ! एका वर्षात ७ हजार ३०० भारतीय झाले कोट्यधीश

१८५७ च्या उठावानंतर ज्या प्रकारे हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडण्याचे  राजकारण इंग्रजांनी केले, तेच प्रकार आता सुरू आहेत. काँग्रेसचा एक नेता म्हणून नव्हे तर भारताच्या प्रगतीची आस असलेला एक नागरिक म्हणून मी हे बोलतो आहे. इतकेच नव्हे तर धार्मिक तेढ निर्माण करण्याऱ्या  राजकारणाचा फटका बसला असल्याची खंत मला वाटते असेही ते म्हंटले.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’04175784-d36b-11e8-8d1c-39e4dcc77447′]