‘दोन बायका फजिती ऐका’ : आमदाराच्या दोन बायकांमध्ये झाली मारामारी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – ‘दोन बायका फजिती ऐका’ हि म्हण मराठी भाषिकांमध्ये लोकप्रिय आहे. याच म्हणीची प्रचिती यवतमाळ जिल्हयात आली आहे. काल मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास आर्णी-केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये भर रस्त्यात कडाक्याची भांडणे झाली. त्याच भांडणाचे रूपांतर मारामारीत झाले.

राजू तोडसाम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पांढरकवडा भागात वाय पॉईंट परिसरात कबड्डीचे सामने भरवण्यात आले होते. प्रसंगी आमदार तोडसाम यांच्या दोन्ही बायका उपस्थित होत्या. मात्र पहिली पत्नी असून हि आमदार दुसऱ्या बायको सोबत राहतात म्हणूनच पहिल्या बायकोने भांडणे केली असे बोलले जाते आहे. दोघींमध्ये मारामारी झाल्या नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्या इतपत पुढे गेले. मात्र दोघीमध्ये कलह कोणत्या बाबीमुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.

पहिल्या पत्नीला डावलून आमदार राजू तोडसाम हे गेल्या काही वर्षांपासून प्रिया नावाच्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत आहेत. आमदार तोडसाम यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट नदेता दुसऱ्या पत्नी सोबत संसार थाटला आहे. दुसऱ्या पत्नी प्रिया या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. अनेक सार्वजनिक ठिकाणी दोघे सोबत असतात. याचाच राग पहिल्या पत्नीला आला म्हणून तिने हा सर्व भांडणाचा प्रकार केला असे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. आमदार तोडसाम यांची पहिली पत्नी आपल्या नातेवाईकांसोबत कार्यक्रमाच्या ठिकाणी आली आणि भांडणाला सुरुवात झाली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like