सावधान ! ३१ जुलै ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ भरण्याची शेवटची तारीख, नाहीतर होईल एवढ्या मोठ्या रकमेचा दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही अजूनही तुमचा आयकर रिटर्न (ITR) दाखल केला नसेल तर पुढील त्रासापासून वाचण्यासाठी लवकर तुमच्या आयकर रिटर्न भरा, कारण असेसमेंट ईयर २०१८ – १९ साठीची आयकर रिटर्नची अंतिम तारिख ही ३१ जुलै २०१९ असणार आहे. जर तुम्ही या तारखेला तुमचा आयकर रिटर्न केला नाहीत तर तुम्हाला भरघोस दंड भरावा लागू शकतो. तुम्ही उशीर केल्यास तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.  ITR वैयक्तिक आयकर, हिंदू अनडिवाइडेड फॅमिली आणि असे करदाते ज्यांच्या खात्याचे ऑडिट होत नाही त्यांना दाखल करावा लागतो.

तर दंडाची रक्कम ५ आणि १० हजार रुपये 
आयकर विभागानुसार, सर्व करदात्यांना ३१ जुलै २०१९ पर्यंत आपला आयटीआर जमा करणे आवश्यक आहे. जर एखादा करदाता अंतिम तारखे पर्यंत आयटीआर दाखल करणार नाही तर त्याला दंड भरावा लागेल. आयकर विभागानुसार ३१ जुलै २०१९ नंतर ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत आयटीआर दाखल करणाऱ्यांना ५००० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. जर ३१ डिसेंबर २०१९ चूकली तर ३१ मार्च २०२० पर्यंत आयटीआर दाखल करणाऱ्याला १० हजार रुपये दंड भरावा लागेल आणि तरी देखील तुम्ही आयटीआर दाखल करु शकला नाहीत तर आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवेल. याशिवाय जर करदात्याचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा आधिक नाही त्यांना १ हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल.

फॉर्म नंबर १६ 
जर तुम्ही नोकरी करतात, तर आयकर रिटर्न करताना फॉर्म नंबर १६ दाखल करा. फॉर्म नंबर १६ कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येतात. कंपन्या ३० जून पर्यंत कर्मचाऱ्यांना फॉर्म नंबर १६ देते. परंतू बदल झाल्यानंतर याला उशीर देखील होऊ शकतो. पण तुम्ही कंपनीकडे फॉर्म नंबर १६ मागू शकतात. फॉर्म नंबर १६ मध्ये कंपन्यांना संपुर्ण काळात देण्यात आलेली रक्कम आणि कर कापल्याची माहिती द्यावी लागते.

आरोग्यविषयक वृत्त

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !