Filmfare Awards | शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त


पोलीसनामा ऑनलाइन :
नुकताच 2022 चा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Awards) पार पडला. यामध्ये शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला देखील पुरस्कार देण्यात आले आहे. ‘वारसा’ असे या माहितीपटाचे नाव आहे. या माहितीपटाची निर्मिती कोल्हापुरातील सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे. तर या माहितीपटाला बेस्ट फिल्म नॉन फिक्शन गटातून फिल्मफेअर पुरस्काराने (Filmfare Awards) सन्मानित करण्यात आले. मुंबईतील सेव्हन स्टार हॉटेलमध्ये हा पुरस्कार समारंभ पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धतंत्र निर्माण केले होते. त्याचा वारसा आजही कोल्हापुरातील काही लोक जपतात आणि याला शिवकालीन युद्ध कला या नावाने ओळखले जाते.
या माहितीपटातून याच युद्ध कलेचा वारसा कोल्हापुरातील स्थानिक कसे जपतात यासाठी काय प्रयत्न करतात हे दाखवण्यात आले आहे.
या माहितीपटांमध्ये वस्तादांच्या व खेळाडूंच्या मुलाखती काही प्रत्यक्ष खेळ असे एकूण 25 मिनिटाचा हा माहिती पट आहे.
(Filmfare Awards)

कोल्हापुरात आजही विविध कुस्ती, मल्लखांब, शिवकालीन युद्ध कला अशा खेळांचा समावेश आहे आणि अशाच
या खेळांविषयी माहिती या माहितीपटातून मांडण्यात आली आहे. या माहितीपटासाठी संदीप पाटील, प्रसाद पाध्ये,
सतीश सूर्यवंशी, सिद्धेश सांगावकर, चिन्मय जोशी, कविता ननवरे, कुणाल सूर्यवंशी, डॉ. शरद भुताडिया,
अमित पाध्ये, मीनार देव, प्रशांत भिलवडे, मंदार कमलापूरकर, शुभम जोशी, विनायक कुरणे, किरण देशमुख,
सचिन गुरव व सहकार्‍यांनी मोलाची साथ दिली आहे.

Web Title :- Filmfare Awards | A documentary based on the war art of the Shiva period won this year’s Filmfare Award

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radish Health Benefits | जाणून घ्या पोटाचा त्रास टाळण्यासाठी मुळा खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Yoga Asanas For Neck Pain Relief | मानदुखी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात ‘ही’ आसने; जाणून घ्या