अखेर कुल-थोरात व्यासपीठावर एकत्र आले आणि एक दुसऱ्याला…

दौंड : अब्बास शेख – दौंड तालुक्याचे राजकारण सध्या विविध मुद्द्यांवरून गाजत आहे. आता १२०० कोटी रुपयांच्या विकासकामांवरून मोठे द्वंद्व सुरू झाले असून कुल-थोरात यांनी १२०० कोटी रुपयांच्या विकासकामांवरून एक दुसऱ्याला सामोरा समोर येऊन चर्चा करण्याचे आव्हानच देऊन टाकले आहे.

एक दुसऱ्याला आव्हान देऊन महिना लोटत आला असला तरी दोन्ही नेते मात्र एकत्र येण्याचा योग काही जुळून येत नव्हता मात्र दौंड शहरातील महालक्ष्मी मल्टीहॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि एक दुसऱ्याच्या शेजारी शेजारी बसले यामुळे या खाजगी कार्यक्रमाला आलेल्या दौंडकरांनाही आता पुढे काय होणार भाषणांमध्ये कोण काय बोलणार याची मोठी उत्सुकता लागून राहिली होती परंतु घडले नेमके उलटेच माजी आमदार रमेश थोरात हे भाषणासाठी उठले आणि त्यांनी दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांचे आदराने नाव घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला तर तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनीही  दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेशराव थोरात यांचे आदराने नाव घेत अजूनही मोठा आश्चर्याचा धक्का दिला कारण सध्याचे आरोप प्रत्यारोपांचे वातावरण पाहता दोन्ही नेते एक दुसऱ्याचे नाव घेण्याचे टाळून एकदुसऱ्यावर टिका, टिप्पणी करण्याची संधी मात्र  सोडत नाहीत हे सर्वश्रुत आहे.

एक दुसऱ्याकडे एक नजर न पाहणारे नेते आपल्या मुख्य विरोधकाचे नाव इतक्या आदराने घेत असल्याने या दोन्ही आजी-माजी आमदारांमध्ये कितीही मतभेद असले तरी दोघांनीही आपापल्या परीने एक दुसऱ्याचा मान ठेवल्याचा प्रसंग हा सर्वांनाच सुखद धक्का देऊन गेल्याचे अनेकांच्या चर्चेतून स्पष्ट होत होते. त्यामुळे राजकारणातील विरोध हा राजकीय पटलावर जरी असला तरी तो वयक्तिक नसतो हेच आज सर्वांना दिसून आले.