एकता कपूरची ‘XXX’ वेब सीरिज पुन्हा एकदा वादात ! मुंबईनंतर ‘या’ शहरांमध्ये दाखल झाली FIR

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   एकता कपूर सध्या तिची वेब सीरिज xxx 2 मुळं चर्चेत आहे. या सीरिजच्या काही सीन्समध्ये भारतीय सैन्याचा अपनमान केला असल्याचं बोललं जात आहे. . यात महिला पतीसोबत प्रतारणा करताना दिसत आहे. वादग्रस्त सीनमध्ये महिला आर्मी युनिफॉर्म फाडताना दिसत आहे. अनेक आक्षेपार्ह सीन्सही आहेत. हे सगळं सांगत हिंदुस्तानी भाऊनं मुंबईत यासंदर्भात पोलिसात तक्रार केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा ही सीरिज वादात सापडली आहे. एकता कपूरसह 3 लोकांवर अश्लीलता पसरवणं आणि राष्ट्रीय चिन्हांचा अपमान केल्याप्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील इंदोरमधील अन्नपूर्णा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या सीरिजमध्ये असं दाखवलं आहे की, एक जवान आपलं कर्तव्य बजावण्यासाठी ड्युटीवर गेल्यानंतर त्याची पत्नी प्रियकराला घरी बोलावते. यात भारतीय लष्कराचा आणि जवानांचा अपमान झाल्याचं बोललं जात आहे. हाच धागा पकडत हिंदुस्तानी भाऊनं तक्रार दाखल केली होती. इतकंच नाही तर कन्फेडरेशन ऑफ एक्स पॅरामिलिटरी फोर्स वेलफेअर असोसिएशननं राष्ट्रपतींकडे याबाबत तक्रार केली होती. असोसिएशनचे सरचिटणीस रणबीर सिंह म्हणाले होते की, लाखो सैनिक अशा बेजबाबदार चित्रीकरणाला विरोध करतात. अशी माहिती आहे की, दिल्लतही याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

View this post on Instagram

We may all be in lockdown, but through the medium of television, we continue to be entertained by our favourite stars & shows. An excellent initiative fankafan.com has been launched in an effort to mobilise the massive fan base that the TV industry enjoys. An endeavour to help direct the love ‘fans’ have for their favourite stars. Fankafan encourages fans to donate via the official site fankafan.com towards the #PMCaresFund to help battle covid-19. So head to the website, select your favourite star & donate via fankafan.com & you will receive a special ‘Thank You’ video from the selected celebrity on the list. In this way you’ve donated for a good cause and your celebrity is now ‘your fan’. So head to the website, donate and partake in the battle against Covid-19. The only way ahead, is together! @fankafanindia #fankafan @jd_majethia

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor) on

दरम्यान एकताच्या निकटवर्तीयांनी अशी माहिती दिली आहे की, सीरिजमधून तो सीन हटवण्यात आला आहे. परंतु यासंदर्भात अद्याप कोणतंही अधिकृत स्टेटमेंट मात्र समोर आलेलं नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like