FIR On Manoj Jarange Patil In Pune | पुणे: वाघोलीत पहाटे सभा घेतल्याप्रकरणी मनोज जरांगे पटील यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – FIR On Manoj Jarange Patil In Pune | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जानेवारीमध्ये मुंबईला उपोषणासाठी जात असताना वाघोलीत (Wagholi) पहाटे विनापरवाना स्पीकर लावून सभा घेतली. याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोली येथील मराठा समन्वयकांवर दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक रितेश काळे यांनी फिर्याद दिली असून जरांगे पाटील यांच्यासह गणेश म्हस्के, संदीप कांबीलकर, शेखर पाटील व इतर आठ ते दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबई येथे उपोषणाला जात असताना 23 जानेवारी रोजी रात्री वाघोली चोखी ढाणी रोडच्या मैदानावर मुक्की होते. त्यावेळी वाघोली मधील मराठा समन्वयकांनी लोणीकंद पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सूचना दिल्या होत्या. प्रत्यक्षात जरांगे पाटील पहाटे चारच्या सुमारास वाघोली येथे पोहोचले. यानंतर त्यांनी एक तास पहाटेची सभा घेतली होती. आयोजकांनी विनापरवाना स्पीकर लावून सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केले. याप्रकरणी दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलिसांनी गुरुवारी (दि.7) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तब्बल 40 वर्षांनी सुटणार घोरपडी मधील वाहतूक कोंडी; आमदार सुनील कांबळे यांच्या प्रयत्नांना यश