Firecracker Stalls In Pune | फटाका विक्री स्टॉलच्या ऑनलाईन लिलावामुळे महापालिकेचे उत्पन्न पाच पटीने वाढले

महापालिकेला १२ दिवसांसाठी मिळाले तब्बल ७० लाख रुपये उत्पन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Firecracker Stalls In Pune | महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) यंदा फटाका विक्री स्टॉलचा ऑनलाईन लिलाव केल्याने तब्बल पाच पट उत्पन्न मिळाले आहे. यापैकी नारायण पेठेतील वर्तक बागेलगतच्या ३५ स्टॉल्सच्या बारा दिवसांच्या भाड्यापोटी ५९ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर शहरातील उर्वरीत सुमारे ९७ स्टॉल्सचे ११ लाख लाख असे एकूण ७० लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी सर्व स्टॉल्सचे मिळून जेमतेम १७ लाख ५७ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. (Firecracker Stalls In Pune)

महापालिका गेली अनेक वर्षे फटाका विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देते. याठिकाणी उभारण्यात येणार्‍या स्टॉल्सचा लिलाव करण्यात येतो. काही वर्षांपासून वर्तक बाग येथे सर्वाधीक ३५ स्टॉल्स असतात. येथे घाउक विक्रेत्यांची संख्या अधिक असल्याने व्यवसायही चांगला होतो. तसेच उपनगरातही सुमारे १७३ स्टॉल्स असतात. तुलनेने या स्टॉलसाठीचे भाडेदर हे कमी आहेत. (Firecracker Stalls In Pune)

यंदा अनेकांच्या विरोधानंतरही महापालिकेने स्टॉल्ससाठी ऑनलाईन सोडत काढली होती. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वर्तक बागेतील ३३ स्टॉल्सचे लिलाव झाले होते. याठिकाणी बोलीची रक्कम ५९ लाखांपर्यंत पोहोचली. सरासरी १ लाख ८० हजार रुपये भाडेदर राहीला. सर्वाधीक बोली ही २ लाख १० हजार एक रुपयांची आहे. तर याठिकाणी एका स्टॉलची बोली सुरू असताना एका व्यावसायीकाने १ लाख ७० हजार रक्कम लिहिताना एक शून्य अधिकचा घातल्याने १७ लाख रुपये बोलीची रक्कम दिसून आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. अखेर ही चूक दुरूस्त केल्यानंतर फेरलिलाव करण्यात आला. उपनगरातील १७३ पैकी १२७ स्टॉल्सचा लिलाव झाला होता. यातून सुमारे ११ लाख रुपये मिळणार आहे.

मागीलवर्षी ऑफलाईन लिलाव पुकारण्यात आले होते. वर्तक बागेतील एका स्टॉलसाठी सर्वाधीक बोली १ लाख १ रुपयांची होती. येथून १४ लाख ५७ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. तर शहरातील अन्य स्टॉलचे ३ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

ऑनलाईन लिलाव पद्धतीमुळे पारदर्शकता वाढली.
अत्यंत सोप्या पद्धतीने लिलावाची प्रक्रिया केल्याने अडचणी आल्या नाहीत.
ऑनलाईन लिलावामुळे नव्या व्यावसायीकांनाही निकोप स्पर्धेची संधी मिळाली.
लिलावात विजेते ठरलेल्या विक्रेत्यांना चलन देण्यासही सुरूवात केली आहे.
तसेच अग्शिशामक व अन्य परवानग्या देखिल एका ठिकाणच्या व्यवसायासाठी एकच परवानगी या तत्वावर देण्यात येत असल्याने विक्रेत्यांनीही समाधान व्यक्त केले.

  • महेश पाटील, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका (Mahesh Patil PMC)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्हि. जी. कुलकर्णी सेवानिवृत्त