Pune PMC News | महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्हि. जी. कुलकर्णी सेवानिवृत्त

अनिरुध्द पावसकर यांच्याकडे पथ तर नंदकिशोर जगताप यांच्याकडे पाणी पुरवठा विभागाचा पदभार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी (VG Kulkarni) हे आज महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर (Aniruddha Pawaskar) यांची पथ विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap) यांनी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune PMC News)

व्हि. जी. कुलकर्णी हे 1994 मध्ये महापालिकेच्या सेवेत दाखल झाले. महापालिकेच्या 30 वर्षांच्या सेवेत त्यांनी पाणी पुरवठा विभागात सर्वाधिक काळ अर्थात जवळपास 26 वर्षे काम पाहिले आहे. या कालावधीत खडकवासला ते पर्वती आणि पर्वती ते लष्कर जलकेंद्र बंद पाईप योजना, भामा आसखेड पाणी पुरवठा योजना, चोवीस तास पाणी पुरवठा योजनांसह वारजे, वडगाव पाणी पुरवठा केंद्र तसेच काही एसटीपी प्लांटच्या निर्मिती मध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. मागील चार वर्षांपासून त्यांच्याकडे पथ विभागाचा कार्यभार होता. (Pune PMC News)

कुलकर्णी यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नंदकिशोर जगताप यांच्याकडे पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पावसकर यांनी यापूर्वी बांधकाम तसेच पथ विभागात कामकाज पाहिले आहे. आज निवृत्त होणाऱ्यांमध्ये सेवक वर्गाचे प्रमुख अरुण खिलारी हे देखील वयोपरत्वे निवृत्त झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhide Wada Smarak | भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक? रहिवासी व व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, मात्र हिंसेला थारा नाही; आंदोलकांना फडणवीसांचा इशारा (व्हिडिओ)

Pune Police Mcoca Action | चतु:श्रृंगी परिसरात दहशत माजवणाऱ्या सागर चांदणे व त्याच्या 10 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 74 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA