Firing In Islampur | इस्लामपूर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून हवेत गोळीबार, कव्वाली कार्यक्रमात हजारोंच्या उपस्थितीत घडला प्रकार

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Firing In Islampur | इस्लामपूर मोमीन मोहल्ला (Islampur Momin Mohalla) येथे एका कवाली कार्यक्रमाच्या मंचावरूनच माजी नगरसेवकाने हवेत गोळीबार (Firing In Islampur) केल्याची घटना उघडकीस आली आहे. हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष (Sangli Crime) लागले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

इस्लामपूर शहरात पैगंबर जयंतीनिमित्त ख्वाजा गरीब नवाज सोशल वेलफेअर ट्रस्टच्या (Khwaja Garib Nawaz Social Welfare Trust) वतीने सोमवारी सायंकाळी 7 वाजता आमिल आरिफ साबरी (Amil Arif Sabri) यांचा बज्मे कव्वालीचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी हा प्रकार घडला. एका पक्षाचे हे माजी नगरसेवक नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. पूर्वीच्या वादातून मोमीन मोहल्ला परिसरातील पक्षाचे कार्यालय फोडण्यात आले होते.

काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या (NCP) माजी उपनगराध्यक्षांशी त्यांचा जोरदार वाद झाला होता.
चार दिवसापूर्वी मोमीन मोहल्ला येथे कव्वालीचा कार्यक्रम चांगलाच रंगला होता.
मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कव्वालीच्या मंचावरूनच या माजी नगरसेवक यांनी हवेत गोळीबार (Firing In Islampur) केला.
त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या कार्यक्रमास माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil)
यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी कार्यक्रमासाठी काही वेळ उपस्थिती लावत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या होत्या.
आता माजी नगरसेवकाने (Former Corporator) हवेत गोळीबार करुन पोलीस प्रशासनाला एक प्रकारे
कामाला लावले आहे. गोळीबाराचा तपास करुन पोलीस प्रशासन कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title :-Firing In Islampur | Islampur NCP corporator fired in the air, the incident happened in the presence of thousands of Qawwali program

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chitra Wagh | भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची जयंत पाटलांवर बोचरी टीका, जंतराव…निदान न कळणारी लबाडी तरी करा

Nashik CBI ACB Trap | 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना लष्करातील दोन अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Rutuja Latke | राजीनामा मंजूर झाल्यानंतर ऋतुजा लटके म्हणाल्या…