Chitra Wagh | भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची जयंत पाटलांवर बोचरी टीका, जंतराव…निदान न कळणारी लबाडी तरी करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chitra Wagh | भुजबळ साहेबांना (Chhagan Bhujbal) शिवसेनेतून फोडले होते तो अश्वमेध यज्ञ होता… आणि आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वतःहून बाहेर पडले तर ते भाजपाचे (BJP) पाप…??? जंतराव…निदान न कळणारी लबाडी तरी करा, अशी बोचरी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला. जयंत पाटील यांनी म्हटले की, हिंदुत्वाची मते फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपाला ग्रासले असल्यामुळे शिवसेना (Shivsena) फोडण्याचे पाप भाजपाने केले. शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच होती. जयंत पाटील यांच्या या आरोपाला भाजपाने आता प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जयंत पाटील यांच्या जाणीवपूर्वक ‘जंत’राव असा उल्लेख करत बोचरी टीका केली आहे. जयंत पाटील यांच्या आरोपाला उत्तर देताना वाघ यांनी छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हाचे उदाहरण दिले आहे.

जयंत पाटील यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी बंडाळीची कबुलीच दिल्यामुळे अर्थ स्पष्ट आहे की,
शिवसेना फोडण्याचे आणि बाळासाहेबांच्या पक्षाचे दोन तुकडे करण्याचे कारस्थान भाजपाने केले आहे.
आता बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोग (Election Commission) मान्य करतो.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे उद्धव ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वडील.
उद्धव ठाकरे यांचा त्या नावावर पूर्ण अधिकार असे असताना निवडणूक आयोग निर्णय घेतो हे किती प्लॅनिंगने
सुरू आहे. हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येते आहे,
त्यामुळेच राज्यातील जनतेचा भाजप आणि एकनाथ शिंदे सरकारवरील राग पदोपदी वाढत आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेनंतर भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनीही
जयंत पाटील यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधत म्हटले आहे की, कपटाने आलेले कपटाने गेले,
जयंतराव जनतेने सरकार स्थापण्यासाठी ज्यांना मतदान केले होते, ते सत्तेवर आले.

Web Title :- Chitra Wagh | bjp chitra wagh slams ncp jayant patil over his statement on eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक- 2 नं कोल्हापूरच्या ‘डॉक्टर डॉन’ला इंदूरमधून घेतले ताब्यात; गज्या मारणेसह खंडणी प्रकरणात सहभाग निष्पन्न

Girish Mahajan | मला जाणून बुजून लक्ष्य केले गेले; व्हायरल ऑडिओ क्लीपवर गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

Rutuja Latke | राजीनामा मंजूर झाल्यानंतर ऋतुजा लटके म्हणाल्या…