First Look : ‘रश्‍मि रॉकेट’ सिनेमात तापसी पन्नू बनणार ‘धावपटू’, पोस्टर रिलीज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा मोठ्या खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बेबी’, नाम शबाना यांसारख्या सिनेमांत ऍक्शन केल्यानंतर तिने सुरमा मध्ये एका हॉकी खेळाडूची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता नवीन सिनेमात ती धावपटू बनणार आहे. ‘रश्‍मि रॉकेट असे तिच्या नवीन सिनेमाचे नाव असून या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे. या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले असून तापसी पन्नू हिने कालपासून चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. गुजरातमधील धावपटू रश्मी हिच्या जीवनावर आधारित आहे.

या सिनेमाच्या पोस्टरमध्ये तापसी कच्छ मधील रेसिंग ट्रॅकवर धावताना दिसून येत आहे. मात्र तापसी केवळ याच सिनेमात खेळाडूच्या भूमिकेत नजर येणार नसून ती आपल्या पुढील सिनेमात देखील खेळाडूच्या भूमिकेत समोर येणार आहे. ‘सांड की आंख’ असे या सिनेमाचे नाव असून तिच्या भूमिकेबद्दल अद्याप जास्त माहिती मिळालेली नाही. मात्र मिशन मंगल नंतर तापसीला अनेक सिनेमांच्या ऑफर मिळत असून बॉलिवूडमध्ये तिचा भाव देखील वाढला आहे.

दरम्यान, तापसी पन्नू हिच्या मिशन मंगल या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता या दोन सिनेमांना देखील असेच यश मिळो अशी प्रार्थना सध्या तापसी पन्नू करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like