First “Phoenix Cup” T-20 Senior Men’s Cricket Tournament | पहिली ‘फिनिक्स् करंडक’ अजिंक्यपद प्रौढ गट टी-२० क्रिकेट स्पर्धा; फोनिक्स् क्रिकेट क्लब, न्युट्रीलिशियस् क्लब यांच्यात विजेतेपदासाठी लढत !!

पुणे, १९ ऑक्टोबरः First “Phoenix Cup” T-20 Senior Men’s Cricket Tournament | फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब तर्फे आयोजित पहिल्या ‘फिनिक्स् करंडक’ अजिंक्यपद प्रौढ गट टी-२० क्रिकेट स्पर्धेत फोनिक्स् क्रिकेट क्लब आणि न्युट्रीलिशियस् क्लब या संघांनी अनुक्रमे रायगड वॉरीयर्स आणि बीकेसी क्लब या संघांचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. फोनिक्स् क्रिकेट क्लब आणि न्युट्रीलिशियस् क्लब या दोन्ही संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

सहकारनगर येथील ल. रा .शिंदे हायस्कूल मैदान आणि स्केल-अप मैदान, वारजे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत आतिश पडवळ याच्या अष्टपैलू खेळीमुळे फोनिक्स् क्रिकेट क्लब संघाने रायगड वॉरीयर्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रायगड वॉरीयर्सने १९१ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये प्रितम कैया याने नाबाद ७५ धावांची खेळी केली. यासह रविश चित्रिगेमठ (३४ धावा) आणि सतिश देवकर (२४ धावा) यांनीही धावांचे योगदान दिले. आतिश पडवळ याने ४७ धावात २ गडी बाद केले. फोनिक्स् क्रिकेट क्लबने हे लक्ष्य १८.३ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. देवदत्त देशपांडे (५८ धावा), विनायश शिंत्रे (नाबाद ४८ धावा), आतिश पडवळ (४४ धावा) यांनी महत्वपूर्ण धावा करून संघाचा विजय साकार केला.

समाधान दांडेकर याच्या ९० धावांच्या खेळीच्या जोरावर न्युट्रीलिशियस् क्लबने बीकेसी क्लबचा ३ गडी राखून पराभव
करत अंतिम फेरी गाठली. बीकेसी क्लबने पहिल्यांदा खेळताना १३५ धावा धावफलकावर लावल्या. प्रशांत तेलंगे (४१ धावा) आणि धीरज कदम (३७ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. युट्रीलिशियस् क्लबने अखेरच्या षटकारमध्ये लक्ष्य गाठले. समाधान दांडेकर याने ५७ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांसह ९० धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः
रायगड वॉरीयर्सः २० षटकात ७ गडी बाद १९१ धावा (प्रितम कैया नाबाद ७५ (५०, ९ चौकार, ४ षटकार), रविश चित्रिगेमठ ३४,
सतिश देवकर २४, आतिश पडवळ २-४७) पराभूत वि. फोनिक्स् क्रिकेट क्लबः १८.३ षटकात ३ गडी बाद १९४ धावा
(देवदत्त देशपांडे ५८ (४९, ६ चौकार, २ षटकार), विनायश शिंत्रे नाबाद ४८, आतिश पडवळ ४४, प्रभु अंजल नाबाद २०,
गणेश कडू १-१३); सामनावीरः आतिश पडवळ;

बीकेसी क्लबः २० षटकात ९ गडी बाद १३५ धावा (प्रशांत तेलंगे ४१, धीरज कदम ३७, मनोहर पाटील ४-१४)
पराभूत वि. न्युट्रीलिशियस् क्लबः १९.३ षटकात ७ गडी बाद १३६ धावा (समाधान दांडेकर ९० (५७, १० चौकार, ५ षटकार),
जय रे १३, विजय नवले १-२४); सामनावीरः समाधान दांडेकर;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात ओढून उकळली 8 लाखांची खंडणी, पुण्यातील पती-पत्नीसह तिघांवर FIR

Lalit Patil Drugs Case | ससून ड्रग्ज प्रकरण : पुणे पोलीस ललित पाटीलवर मोक्का अतंर्गत कारवाई करण्याच्या तयारी

Pune News | पुणे रेल्वे स्थानकात ‘फेस रेकग्निशन सिस्टिम’चे १२० सीसी टीव्ही कॅमेरे, आरोपी ओळखून देणार माहिती, जाणून घ्या…