3000 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या जंगलात जन्माला आले ‘तस्मानियन डेव्हिल्स’

मेलबर्न : वृत्त संस्था – ऑस्ट्रेलियातून सर्वात चांगली बातमी आली आहे. येथे खुल्या जंगलात 3000 वर्षानंतर तस्मानियन डेव्हिल नावाच्या प्राण्याचा जन्म झाला आहे. आपण यास ’तस्मानियाचे भूत’ म्हणून शकतो. छोट्या कुत्र्याच्या आकाराचा हा प्राणी मांसाहारी आहे. यास जगातील सर्वात मोठा मार्सुपियल कार्निवोर सुद्धा म्हटले जाते. जे नवीन तस्मानियन डेव्हिल्स जन्माला आले आहेत, त्यांची स्थिती काय आहे? अखेर 3000 हजार वर्षानंतर खुल्या जंगलात या प्राण्याचा जन्म का झाला? एक्स्पर्ट या खुशखबर बाबत काय सांगतात ते जाणून घेवूया…

ऑस्ट्रेलियाच्या तस्मानियामध्ये डेव्हिल आर्क अभयारण्य आहे. येथे एक छोट्या डोंगरासारखे ठिकाण आहे, ज्यास बॅरिंग्टन टॉप म्हटले जाते. याच ठिकाणी तस्मानिया डेव्हिल्सच्या सात छाव्यांचा जन्म झाला आहे. या अभयारण्याचे अधिकारी आणि एका कंजरव्हेशन गटाच्या लोकांना ही माहिती मिळताच ते घटनास्थळी धावून गेले. त्यांनी पाहिले की, सात छोटे-छोटे गुलाबी फर असलेले छावे आपल्या खड्ड्यासारख्या घरात एकत्र पडलेले होते. त्यांची आई आजूबाजूलाच असेल परंतु जवळ दिवस नव्हती.

आता या छाव्यांना पाहून वन्यजीव एक्सपर्ट खुश झाले आहेत, कारण त्यांच्यात आशा निर्माण झाली आहे की, या नामशेष प्रजातीची संख्या वाढू शकते. ऑस्ट्रेलियाच्या खुल्या जंगलात यांची संख्या यामुळे संपुष्टात आली कारण त्यांची शिकार मोठ्या प्रमाणात होत होती. याशिवाय त्यांना जंगली कुत्र्यांची प्रजाती डिंगोस मारून खात असे. यानंतर या छोट्या डेव्हिल्सची संख्या तस्मानिया राज्यापर्यंत मर्यादित राहिली.

तस्मानियाच्या या डेव्हिल्सच्या समोर आणखी एक मोठी समस्या आहे ती म्हणजे चेहर्‍याचा कॅन्सर होणे. जर हे प्राणी शिकार होण्यापासून बचावले तर यांच्यासाठी दुसरा धोका आहे चेहर्‍यावर ट्यूमर होणे. आता तस्मानियासह संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची संख्या केवळ 25 हजारच्या जवळपास असेल. ऑसी आर्क कंजरव्हेशन ग्रुपचे प्रेसीडेंट टिम फॉकनर यांनी सांगितले की, येथे खुप काही डावावर लागले आहे. आम्हाला जेवढे शक्य होते त्यांना वाचवण्याचा प्रत्न करत आहोत.