Foods to avoid: चुकूनही ‘या’ गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका; शरीराचे होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली:वृत्तसंस्था- तुम्ही रिकाम्या पोटी काही खात अथवा पीत असाल तर याचा परिणाम तुम्हाला संपूर्ण दिवसभर पाहायला मिळेल. जेव्हा भूक लागते तेव्हा मनात येईल ते खाणे, या प्रकारचा ऍटिट्यूड आपल्या शरीराचे नुकसान करू शकतो. आम्ही तुम्हाला खाण्या-पिण्याच्या अशा गोष्टी सांगणार आहोत, जे रिकाम्या पोटी चुकूनही खाल्ले नाही पाहिजे. असे केल्यास शरीराला मोठे नुकसान होऊ शकते.

रिकाम्या पोटी आंबट फळे खाऊ नये
आंबट फळे जसे की संत्री, मोसंबी, पेरू ही अशी फळे आहेत जी खाल्यानंतर ऍसिड निर्माण होते. अशात जर तुम्ही ही फळे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ली तर गॅस्ट्रोइटिस आणि गॅस्ट्रिक अल्सर यासारख्या आजारांचा धोका उद्भवू शकतो. यासोबत या फळांमध्ये फायबर आणि फ्रेक्टॉज जास्त असते आणि रिकाम्या पोटी हे खाल्याने पचन यंत्र सावकाश होईल.

रिकाम्या पोटी कॉफी पिऊ नये
बरेच लोक आपल्या दिवसाची सुरवात रिकाम्या पोटी कॉफी पिऊन करतात, परंतू तुम्हाला तुमच्या या सवयीला आजच बदलावे लागेल. रिकाम्या पोटी कॉफी पिल्याने ऍसिडिटी होऊ शकते, कारण हे पिल्यानंतर पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिडचे सिक्रीशन होतो, त्यामुळे गॅस्ट्राइटिस हा आजरा होऊ शकतो.

रिकाम्या पोटी सॅलेड खाऊ नका
कच्च्या भाज्यांना मिसळून तयार केलेले सॅलड सकाळच्या नाश्त्याच्या ऐवजी जेवणाच्या वेळी खाणे योग्य आहे. कच्च्या भाज्यांमध्ये फायबर अधिक असते आणि जर तुम्ही याला रिकाम्या पोटी खाल्ले तर पाचक यंत्रावर लोड होतो. ज्यामुळे गॅस आणि पोटदुखी यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

मिरची आणि मसालेदार पदार्थ रिकाम्या पोटी खाऊ नका
मिरची आणि मसालेदार पदार्थ रिकाम्या पोटी खाल्याने पोटाच्या आत जळजळ होऊ शकते, ज्यामुळे पोटात पेटके येऊ शकतात. जर तुम्ही रिकाम्या पोटी अति तिखट पदार्थ खाल्ले तर पोटात उष्णता वाढेल आणि ऍसिडचे प्रमाण वाढेल, यामुळे अपचन आणि बद्धकोष्टतेची समस्या होऊ शकते.

रिकाम्या पोटी ,फळांचा रस पिऊ नका
बरेच लोक सकाळच्या नाश्त्याला फळांचा रस पिणे पसंत करतात, परंतू रिकाम्या पोटी फळांचा रस पिल्यामुळे स्वादुपिंडावरील भार वाढतो आणि फळांमध्ये असलेले फ्रॅकटोज लिव्हरवर वाईट परिणाम करते. यासोबत रिकाम्या पोटी फळांचा रस पिल्याने डायबिटीजचा धोका उद्भवतो.