…म्हणून होतंय शिवजन्मभूमितील या 5 जवानांचं सर्वत्र ‘कौतुक’

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – देश रक्षणासाठी भारतीय सैन्यात शिवजन्मभुमीतील पाच शिलेदार दाखल झाले आहेत. या पाच जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे. निकेतन कोंडे (धामणखेल), सुरज डोके (कुमशेत), प्रथमेश महाकाळ (मांदारणे), आदित्य डोंगरे (बल्लाळवाडी), निखिल कबाडी (कबाडवाडी) या पाच जवानांच्या सन्मानार्थ धामनखेल, कबाडीवाडी तसेच येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गावोगावी मिरवणुका काढून त्यांचे सत्कार करण्यात येत आहेत. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. युवकांनी त्यांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली. ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी नगराध्यक्षा भारती मेहेर, तुळशीराम शिरसाठ, बळीराम थोरात, रवींद्र काजळे अक्षदा गाडेकर, गणेश शेटे व मान्यवर उपस्थित होते. धामणखेल येथे या पाच जवानांच्या सन्मानार्थ त्यांचे मार्गदर्शक शिक्षक कॅ. डॉ. बाबासाहेब माने, माजी सैनिक रमेश खरमाळे, पाटील, तसेच गावातील सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते. कबाडवाडी येथे पोलीस निरीक्षक विकास जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला. दरम्यान, एकाच वेळी पाच जणांची निवड होण्याची ही जुन्नरमधील पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले. जुन्नर येथे ओंकार मेहेर मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.