त्या ५ बेपत्ता बालकांनी गंमत म्हणून केला रेल्वेने प्रवास, मुल सुखरूप घरी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – मुले अपहरण होण्याच्या अनेक घटना ताज्या असताना नांदेड शहराच्या मुख्य दाट भागात म्हणजे शहरातील इतवारा भागात असलेल्या मोमीन पुरा परिसरातून काल (ता.२२) सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील इतवारा भागात असलेल्या मोमिनपुरा परिसरातून काल शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक ५ बालके बेपत्ता झाली. नातेवाईकांनी व पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून अद्याप पर्यंत ही बालके सापडले नाहीत.

या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.फिर्यादी नामे महंमद शाह वय ४० वर्ष रा. मोमीनपुरा नांदेड यांच्या फिर्यादी वरून पोलिस ठाणे इतवारा गु.र. नं. ३५८/१८कलम ३६३ भा.द.वी. प्रमाणे गुन्हा नोंद केला. शबाज शाह (वय १०), अब्दुल मुबिन शाह (वय ९), शेख समीर कौसर (वय ९), मोहम्मद रेहान अब्दुल गफार (वय १०), सय्यद जुबेर इक्बाल (वय ८) सर्व राहणार मोमिनपुरा नांदेड हे सर्व काल (ता. २१) दुपारी चार वाजता गल्लीत खेळत असताना घरी परत आले नाहीत म्हणून त्याचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत.

तरी वरील मुलांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून  नेले असेल या वरून गुन्हा दाखल करून तपास सपोनी पठाण यांच्याकडे देण्यात आला होता.नांदेड शहरातील मोमीनपुरा भागातून शुक्रवारी पाच मुले अचानक बेपता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. रात्रभर पोलिसांनी त्या मुलांचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. आज दुपारी ते पाचही जण स्वत:हून सुखरूप परत आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या बाबत अधिक माहिती अशी की, मोमिनपुरा येथील शाबाज शहा, अब्दुल शाह, शेख समीर, मोहमद रेहान आणि सय्यद जुबेर हे ८ ते १० वर्ष वयोगटातील मुले परिसरात खेळत होते. काल दुपारनंतर पाचही जण अचानक बेपता झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी इतवारा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. पोलीस आणि बेपत्ता मुलांच्या नातेवाईकानी रात्रभर त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा शोध लागला नाही.

मात्र गंमत म्हणून पूर्णा पर्यँत रेल्वेप्रवास करून आपल्या जवळील परिसरात उतरले  तपासण्यासाठी पोलिसांचे एक पथक मालटेकडी स्थानकावर गेले. तेव्हा त्याच ठिकाणी हे पाचजण पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना लागलीच इतवारा पोलीस ठाण्यात आणून पालकांच्या स्वाधीन केले. पाचही मुले सुखरूप परत आल्याने पोलीस आणि पालक यांनी सुटकेचा निश्वास टाकला.