३ कोटींच्या जुन्या नोटांसहित नगसेवकासह पाच जणांना रंगेहाथ पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

चलनातून बाद झालेल्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या पाच जणांना खडक पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून सुमारे तीन कोटी रुपये किंमतीच्या २० हजार नोटा जप्त केल्या आहेत . त्यातील एक जण संगमनेर येथील नगरसेवक आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये गजेंद्र बजाबा अभंग (वय ४७, रा संगमनेर, बी. एड़ कॉलेज रोड, संगमनेर)  विजय अभिमन्यू शिंदे (वय३८, रा़ वाकडेवाडी, संभाजीनगर, खडकी), अदित्य विश्वास चव्हाण (वय२५, रा़ भुगाव रोड, ता़ मुळशी), सुरेश पांडुरंग जगताप (वय ४०, रा़ खराडेवाडी, ता़ फलटण, सातारा) आणि नवनाथ काशिनाथ भंडागळे (वय २८, कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत .  याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी फिर्याद दिली आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’afa2ac8c-8be7-11e8-afdb-0bd24fd4d88d’]

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी  की, खडक पोलिसांना माहिती मिळाली होती की, जुन्या नोटांनी भरलेलया बागांसहित काही जण पुण्यात आले आहेत . त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लोहोमकर, माळी, बारवकर, केकाण, नदाफ, क्षीरसागर, माळवदकर यांनी रविवारी पेठेतील बंदिवान मारुती मंदिराजवळ सापळा रचला . मिळालेल्या माहितीनुसार रात्री साडेअकराच्या सुमारास  काही जण आले त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांच्यातील दोघांकडील बॅगेत चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या १००ची १९ बंडले आणि एक हजार रुपयांच्या नोटांच्या १००ची १६० बंडले आढळून आली.

नोटांबाबत पाच जणांकडे चौकशी केली असता या नोटा बदलून घेण्यासाठी  येणार होता, आम्ही त्याची वाट पाहत होतो असे सांगितले. आता या व्यक्तींना नोटांसहित अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा आधीक तपास खडक पोलीस करीत आहेत.