टाचांच्या भेगांनी त्रस्त आहात तर मग ‘या’ टिप्स फोलो करा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शरीराचा अविभाज्य भाग म्हणजे टाचा. (heels) या टाचांच्याच मदतीने आपण उभे राहतो. त्यांच्याशिवाय कोणतेही कार्य करणे कठीण आहे. मात्र आपण अनके लोकांच्या टाचेला भेगा पडल्याचे पाहिले असेल. यामुळे अनेक लोक टाचांना भेगा पडू नये या साठी विविध उपाय करतात. परंतु त्याचा काही वेळा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसते. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे देखील टाचांना (heels) भेगा पडण्याचे कारण आहे. या सह केल्शियम, व्हिटॅमिन इ आणि आयरन च्या कमतरते मुळे देखील भेगा पडतात. त्यामुळे टाचांना मऊ बनवण्यासाठी आपल्या आहारात आणि दिनचर्येत कॅल्शियम, प्रोटीन,आणि व्हिटॅमिन इ युक्त गोष्टी खाण्याची आवश्यकता आहे.

रक्षा खडसेंचा मोठा खुलासा ! म्हणाल्या – ‘एकनाथ खडसे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बोलणं झालं’

बोरोप्लस
रात्री आपले पाय धुवून नंतर टाचेवर बोरोपल्स हि कॉस्मेटिक क्रीम लावली. असे काही दिवस केल्यास टाचा ठीक होतील. तसेच टाचांना भेगा पडू नये यासाठी घरी स्लिपर वापरा.

ऑलिव्ह ऑईलचा वापर
आठवड्यातून तीन वेळा झोपायच्या आधी ऑलिव्ह ऑईलने हलके हातांनी मालिश करा त्यामुळे त्वचा मऊ होईल.

माझ्यामुळं सत्ता गेल्याचं फडणवीसांना दु:ख; संजय राऊतांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला

मिठाच्या पाण्याने स्वच्छ करा
आपल्या टाचांना आठवड्यातून दोन वेळा तरी चांगले स्वच्छ करावे. त्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून काही वेळ पाय बुडवून ठेवावे. त्यानंतर टाचा ब्रश किंवा दगडाने हळुवार चोळावे. टाचेवरील साचलेली घाण बाहेर निघेल. त्यानंतर टाचा स्वच्छ पुसून त्यावर नारळ तेल लावावे. त्यामुळे टाचा स्वच्छ होऊन मऊ होतील.

लिंबू मलई
बर्‍याचदा टाचा धुळीमुळे खूप लवकर फुटतात. अशा परिस्थितीत रात्री झोपायच्या आधी पाय चांगले धुवावेत. यानंतर, लिंबू मलई लावा आणि झोपा. दररोज हे करा. आपल्याला काही दिवसात आराम मिळेल.

तांदळाचे पीठ
आपल्या टाचांमध्ये खूप भेगा असतील तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकतो. कारण हे पीठ स्क्रब म्हणून काम करते. यासाठी एका भांड्यात ३ चमचे तांदळाचे पीठ, १ चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस घालून चांगले ढवळावे. १५ मिनिटे गरम पाण्यात आपले पाय ठेवावेत. त्यानंतर हे तयार केलेले स्क्रब लावावे.

जवसाचे पीठ आणि जोजोबा तेल
हे दोन्ही आपल्या आवश्यकतेनुसार मिसळा आणि दाटपॅक बनवून लावून अर्धा तास तसेच ठेवा.नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.काहीच दिवसात आराम मिळेल.

ग्लिसरीन आणि गुलाबपाणी
आपल्याला फाटलेल्या टाचांपासून लवकर आराम पाहिजे असेल तर ग्लिसरीन आणि गुलाबपाणी याचा वापर करावा. अर्धं गुलाब पाणी आणि अर्ध ग्लिसरीन एका बाटलीत मिसळा, त्यात थोडेसे लिंबू मिसळा. रात्री आपले पाय धुवूनआपण ते लावा. काही दिवसातच आपल्याला आराम मिळेल.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

सुबोधकुमार जयसवाल यांच्या चौकशीचा निर्णय मुंबई पोलिसांचा अखेर रद्द

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !