Food and Drug Administration Pune | …म्हणून पुण्यात वडापाव, पोहे किंवा अन्य खाद्यपदार्थ पेपरमध्ये गुंडाळून मिळणार नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Food and Drug Administration Pune | बाहेर गाड्यावर अथवा हाॅटेलमध्ये गरमा-गरम वडापाव, पोहे किंवा कोणतेही खाद्यपदार्थ आता खाद्यपदार्थ विक्रेत्यांना वर्तमानपत्राच्या कागदामधून देता येणार नाही. कारण वर्तमानपत्र छपाई करतेवेळी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये आरोग्यासाठी घातक असे केमिकल असते. ज्यावेळी ते केमिकल जर कुठल्याही पदार्थात मिसळले तर लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुण्यात देखील याबाबत निर्णय घेतला आहे. (Food and Drug Administration Pune)

 

अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात 5 ऑगस्ट 2011 पासून लागू करण्यात आला आहे. सदर कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेस सुरक्षित, सकस आणि निर्भेळ अन्न उपलब्ध करून देणे हा आहे. या नियमानूसार आता गरम खाद्यपदार्थ पेपेरमध्ये गुंडाळल्यास त्या पेपरची शाई विरघळते व ती खाद्यपदार्थाला लागून पोटात जाते, असं अन्न आणि औषध प्रशासनाचे (Food and Drug Administration Pune) म्हणणे आहे.

दरम्यान, वृत्तपत्रामध्ये अन्न पदार्थ पॅकींग त्वरीत बंद करावे अन्यथा आपणाविरुद्ध अन्न सुरक्षा
व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 अंतर्गत योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
असं सागण्यात आलं आहे. दरम्यान, अनेकदा लोकांमार्फत बाहेरून नाष्टा मागिवला जातो त्यावेळी अन्न व्यावसायिक हे वडापाव,
पोहे या सारखे अन्न पदार्थ वर्तमानपत्रामध्ये बांधून देतात. त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.
तसेच, वृत्तपत्राची शाईमध्ये डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाइल या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी करतात.
या पार्श्वभुमीवर निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title :- Food and Drug Administration Pune | in pune vadapav pohe or hot food will not be wrapped in paper because

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Karuna Dhananjay Munde | परळीतून निवडणूक लढवणार म्हणत करुणा धनंजय मुंडे यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा

Sonali Raut | सोनाली राऊत आहे जबरदस्त कॅलेंडर गर्ल, रणवीर सिंगसोबत देखील केला आहे फोटोशूट

Earn Money From Home | फक्त 50,000 रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय आणि कमवा 5 लाखाहून जास्त रुपये, सरकार देणार 40% सबसिडी

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षात मिळेल भेट ! DA मध्ये होईल 20 हजार पर्यंत वाढ, जाणून घ्या पूर्ण गणित

PM Kisan Sanman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 1 जानेवारीलाच मोदी सरकारकडून भेट; 4 हजार रुपये थेट खात्यात पाठवणार, जाणून घ्या