नूडल सूप प्यायल्याने 9 लोकांचा मृत्यू : जाणून घ्या काय आहे ’बॉन्गक्रेकिक अ‍ॅसिड’, कसे बनते फूड ‘पॉयझनिंग’चे कारण

पोलिसनामा ऑनलाइन – पूर्वोत्तर चीनच्या हिलोजियांग राज्यात घरात बनवलेले नूडल सूप प्यायल्याने एकाच कुटुंबातील 9 लोकांचा मृत्यू झाला. हे सूप कॉन फ्लोअरने तयार केले होते आणि ते एक वर्षापासून फ्रिजरमध्ये ठेवले होते. 5 ऑक्टोबरला सकाळी नाश्त्यात हे सूप प्यायल्यानंतर काही तासांच्या आताच लोकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. काही दिवसात नऊ लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण सूपमध्ये बॉन्गक्रेकिक अ‍ॅसिडची जास्त मात्रा असल्याचे सांगण्यात आले. बॉन्गक्रेकिक अ‍ॅसिड काय असते, हे फूड पॉयझनिंगचे कारण कसे ठरते आणि यामुळे मृत्यू होण्याची शक्यता किती असते, ते जाणून घेवूयात :

काय आहे बॉन्गक्रेकिक अ‍ॅसिड
बॉन्गक्रेकिक अ‍ॅसिड एका फूड पॉयझनिंगमुळे बनते. हे फर्मेंटेड मैदा आणि तांदूळशी संबंधीते फूड आयटममध्ये आढळते. चायना अ‍ॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर फेन झिहॉन्ग यांच्यानुसार, बॉन्गक्रेकिक अ‍ॅसिड खुप विषारी असते. बॉन्गक्रेकिक अ‍ॅसिड ज्या फूड आयटममध्ये असेतल, ते गरम केले तरी सुद्धा त्याचा परिणाम नष्ट होत नाही. याच बॉन्गक्रेकिक अ‍ॅसिडने नूडल सूप विषारी बनवले होते.

चीनमध्ये जारी केला इशारा
चीनमध्ये आरोग्य आयोगाने सोमवारी याबाबत एक इशारा जारी केला आहे, ज्यामध्ये फर्मेंटेड फ्लोअर (कॉर्न फ्लोअर) न घेण्याचा सल्ला दिला आहे. चीनी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, या संपूर्ण प्रकरणात तपास करण्यात आला आहे. तपास हे समोर आले की, कुटुंबियांनी जे नूडल सूप प्यायले होते, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॉन्गक्रेकिक अ‍ॅसिड होते. यामुळे त्या लोकांना फूड पॉयझनिंग झाले.

मृत्यूचे कारण ठरते
बॉन्गक्रेकिक अ‍ॅसिड व्यस्तीच्या आरोग्यासाठी जीवघेणे ठरू शकते. प्रो. फेन यांच्यानुसार, बॉन्गक्रेकिक अ‍ॅसिड युक्त फूड आयटम खाल्ल्याने माणूस आणि जनावर, दोघांमध्ये फूड पॉयझनिंग हाऊ शकते, ज्यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. फूड पॉयझनिंग झाल्यास मृत्यूदर 40 ते 100 टक्के असतो.

12 पैकी 3 जणांचा जीव वाचला
चीनमध्ये बॉन्गक्रेकिक अ‍ॅसिड युक्त नूडल सूप प्यायल्याने काही तासातच कुटुंबातील 9 लोकांचा मृत्यू झाला. 10 ऑक्टोबरला 7 जणाचा तर 12 ऑक्टोबरला एकाचा आणि नव्या सदस्याचा मृत्यू 19 ऑक्टोबरला झाला. 12 पैकी तीन सदस्यांना सूप न आपडल्याने त्यांनी प्यायल्या नव्हते, ते बचावले.