सरकारकडून इशारा ! तुम्हालाही ‘हा’ SMS आलाय? तर लगेच करा Delete नाहीतर…

नवी दिल्ली : सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच माध्यमातून अनेक फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत. त्यानंतर आता सरकारकडूनच एक इशारा देण्यात आला आहे. जर तुम्हाला फ्री रिचार्ज करण्यासाठी मेसेज आले असतील, तर सतर्क व्हा. हे मेसेज तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकतात. तुम्हाला त्याचा मोठा फटका बसू शकतो.

आत्तापर्यंत आपल्याला मोबाईलवरून अनेक अशाप्रकारचे मेसेज आले असतील. पण आता सतर्क राहण्याची गरज आहे. दूरसंचार कंपन्यांच्या ‘सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने (COAI) सर्वसामान्यांना खोट्या, बनावट मेसेजेसपासून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या फेक मेसेजच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल केली जात आहे. ‘सरकारने ऑनलाईन शिक्षणासाठी 10 कोटी ग्राहकांना मोफत रिचार्ज प्लॅन देण्याचा निर्णय घेतला आहे’, असा फेक मेसेज अनेक ग्राहकांना पाठवला जात आहे. मात्र, हा मेसेज खोटा असून, अशा प्रकारच्या कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

‘सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने याबाबत सांगितले, की अशाप्रकारच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. या लिंकमुळे मोबाईल फोनमधून आवश्यक माहिती, इतर डिटेल्स चोरला जाऊ शकतो. सरकारचा असा कोणताही निर्णय नाही. त्यामुळे अशाप्रकारचा मेसेज कुठेही फॉरवर्ड करू नये. हा मेसेज लगेच डिलीट करावा, असाही सल्ला देण्यात आला आहे.