‘त्या’मुळे आजच गुंडाळणार अर्थसंकल्पीय अधिवेशन ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील वाढता तणाव पाहता देशभरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं विधीमंडळ अधिवेशन गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्व गटनेत्यांची बैठक सकाळी सुरू आहे. या बेठकीनंतर अधिवेशन स्थगित होणार असल्याची माहिती समजत आहे. पुढील एक तासात याची अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजत आहे.
अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि आमदार हे मुंबईत विधानभवन परिसरात असतात. यामुळे सुरक्षेवर अतिरीक्त ताण येतो. म्हणूनच याबाबत निर्णय घेण्यासाठी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. याच बैठकीत सर्व नेत्यांशी चर्चा करून अधिवेशन संपवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे असे समोर आले आहे.
कालच सुरक्षा आढावा बैठक पार पडली. या बैठकीत चालू बजेट अधिवेशन संपवण्याबाबत विचार झाला होता. अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि आमदार हे मुंबईत विधानभवन परिसरात असतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर ताण येतो. मुख्य म्हणजे सर्व VIP एकाच ठिकाणी जमत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सदर विधानभवन परिसर हा सर्वात अधिक संवेदनशील होतो. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. अधिवेशन संपवण्याबाबत यात निर्णय घेतला जाऊ शकतो.
परंतु या सर्व मुद्द्यांवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “अधिवेशन गुंडाळणे म्हणणे पळपुटेपणा आहे. अधिवेशन स्थगित करायला आमचा विरोध आहे. एकीकडे अ‍ॅप उद्घाटन सुरू आहे, सभा सुरू आहेत ,मोदी फिरतात त्यांना संरक्षण लागत नाही का ? हे नाटक बंद करा” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. इतकेच नाही तर, आपला विंग कमांडर तिकडे पाकिस्तानात आहे आणि आपण पळपुटेपणा करतो, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग, समझोता एक्सप्रेस रद्द 

लोकसभा निवडणूक : माढ्यातून शरद पवारांच्या विरोधात राजू शेट्टी रिंगणात ? 

पकडलेले ‘ते’ 2 डंपर, 1 ट्रॅक्‍टर गायब ; प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर