फोर्ब्स 2019 : स्कारलेट जोहानसन यंदाही कमाईमध्ये ‘टॉप’, दीपिका व प्रियंकाचं काय ?, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फोर्ब्सने 2019 मध्ये सर्वाधिक  कमाई करणाऱ्या अ‍ॅक्ट्रेसची यादी जाहीर केली आहे. या यादीतून बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये गेलेल्या दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोपडा बाहेर झाल्या आहेत. या टॉप10 अभिनेत्रीच्या यादीत हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस स्कारलेट जोहानसन पहिल्या क्रमांकावर आहे.

34 वर्षीय स्कारलेट सलग दुसऱ्यांदा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मार्व्हल्सच्या अ‍ॅव्हेंजर्स सीरीजमध्ये लेडी सुपरहिरो ब्लॅक विडो म्हणून स्कारलेट प्रसिद्ध आहे. 2018 मध्ये तिने 15.5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 110 कोटींची कमाई केली होती. तिने या वर्षी 56 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 400 कोटी रुपये कमावले आहेत. तिच्या या यशाच कारण म्हणजे अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमचं यश.

फोर्ब्सच्या या यादीत दीपिका आणि प्रियंकाला स्थान मिळू शकलेलं नाही. दीपिकाचा 2018 मधील पद्मावत सिनेमानंतर एकही सिनेमा आला नाही. याशिवाय अ किड लाइक जॅक आणि इजंट इट रोमँटीक या दोन हॉलिवूड सिनेमात प्रियंकाने काम केलं आहे. सध्या तीही बॉलिवूडपासून दूर आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे सोफिया वेरगारा. तिची कमाई 41.1 डॉलर म्हणजे जवळपास 239 कोटी इतकी आहे. तर रीज विदरस्पून ही अॅक्ट्रेस 35 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 250 कोटींची कमाई  करत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

काही दिवसांपूर्वी फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांचीही यादी जाहीर केली होती ज्यात द रॉक म्हणून ओळखला जाणारा ड्वेन जॉनसन पहिल्या क्रमांकावर होता. तर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार 466 कोटींची कमाई करत चौथ्या क्रमांकावर होता.