Corona Vaccine : चुकून एकाचवेळी दिले ‘कोरोना’ लशीचे 4 डोस, प्रचंड खळबळ

तेल अवीव : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात हाहाःकार माजवला असून ब्रिटन आणि अफ्रिकेमध्ये नुकतेच आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे काळजी आणखीनच वाढली आहे. काही देशांनी कोरोना लशीला मान्यता देऊन लसीकरण सुरु केले आहे. इस्त्राई देशाने लशीला मान्यात दिली आहे मात्र, लशीकरणादरम्यान एक घटना घडली आहे. एका औषध निर्माण कंपनीने कर्मचाऱ्याला लशीचा एक डोस देण्याऐवजी एकदाच चार डोस दिल्याचे समोर आले. हे वृत्त संपूर्ण देशात पसरताच एकच खळबळ उडाली आहे.

इस्त्राईमधील एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, लशीकरणाचे अतिरिक्त डोस देण्यात आलेल्या कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. उदय अजीजी असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. संबंधित व्यक्तीने लस टोचल्यानंतर त्या जागेवरील मांसल भाग लाल झाला होता, असे सांगितले. लस टोटलेल्या जागी त्रास होत असल्याचेही त्याने सांगितले. यानंतर लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील डोस तीन आठवड्यानंतर घेणार असल्याचे कर्मचाऱ्याने यावेळी सांगितले.

अशी घडली घटना
ज्या कर्मचाऱ्याला लसीकरणाचे काम देण्यात आले होते, त्याला लशीचा डोस कसा देयचा याची कल्पना नव्हती. तेथील एका पात्रात कोरोना लशीचे चार डोस ठेवण्यात आले होते. फायझर कंपनीच्या लशीच्या एका पात्रात 4 ते 5 डोस असल्याची कल्पना लस टोचणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास नव्हती. इस्त्राइलमध्ये आतापर्यंत 30 हजार लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. मात्र, या लशीचे दुष्परिणाम झाल्याचे ब्रिटन आणि अमेरिकेत पहायला मिळत आहे.

पंतप्रधानांनी टोचून घेतली लस
इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी मागिल आठवड्यात कोरोनापासून संरक्षण मिळावे यासाठी कोरोनाची लस टोचून घेतली आहे. या लसीकरणाचे टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना 10 रुग्णालयांमधील लशीकरण विभागात लशीचे डोस देण्यात येणार आहे. नंतर ही लस सामान्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.