Foreign Portfolio Investors | FPI नं सप्टेंबरमध्ये केली 26,517 कोटी रुपयांची गुंतवणूक, ‘हे’ होतं आकर्षणाचे कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Foreign Portfolio Investors | परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदार म्हणजे एफपीआय (Foreign Portfolio Investors) ने सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात निव्वळ 26,517 कोट रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा लागोपाठ दुसरा महिना आहे जेव्हा एफपीआय भारतीय बाजारात (Indian market) निव्वळ खरेदीदार आहेत.

डिपॉझिटरी (depository) च्या आकड्यांनुसार, एफपीआयने (Foreign Portfolio Investors)
1 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान शेयरमध्ये 13,154 कोटी रुपये तसेच कर्ज किंवा बाँड बाजारात (debt or bond market) 13,363 कोटी रुपये टाकले. अशाप्रकारे त्यांची निव्वळ गुंतवणूक 26,517 कोटी रुपये होती. यापूर्वी एप्रिलमध्ये FPI ने भारतीय बाजारात 16,459 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

उद्योन्मुख बाजारात एफपीआयची गुंतवणूक
कोटक सिक्युरिटीजचे कार्यकारी उपाध्यक्ष (इक्विटी तांत्रिक संशोधन) (Kotak Securities Executive Vice President, Equity Technical Research) श्रीकांत चौहान (Shrikant Chauhan) यांनी म्हटले, बहुतांश प्रमुख उद्योन्मुख बाजारांमध्ये एफपीआयने सप्टेंबर महिन्यात भांडवल लावले आहे. या दरम्यान भारतात एफपीआयचा प्रवाह सर्वात जास्त होता. त्यांनी म्हटले की, या दरम्यान दक्षिण कोरियाच्या बाजारांमध्ये एफपीआयची गुंतवणूक 88.4 कोटी डॉलर, थायलंडमध्ये 33.8 कोटी डॉलर आणि इंडोनेशियामध्ये 30.5 कोटी डॉलर होती.

सावधगिरीची भूमिका सोडत आहेत FPIs
मॉर्निंगस्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर (रिसर्च) (Associate Director (Research), Morningstar India)
हिमांशु श्रीवास्तव (Himanshu Srivastava) यांनी म्हटले, सध्याच्या कल पाहता संकेत मिळतात की,
एफपीआय आता अल्प कालावधीतील आव्हानांच्या पुढे पाहू लागले आहे आणि त्यांचे लक्ष व्यापक भूमिकेवर आहे.
त्यांनी म्हटले की, एफपीआय हळुहळु आपली सावधगिरीची भूमिका सोडत आहे आणि भारतीय बाजारांवरील त्यांचा विश्वास वाढत आहे.

Web Title :- Foreign Portfolio Investors | fpis net buyers for 2nd consecutive month invest rs 26517 crore in september 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2,692 नवीन रुग्णांचं निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीसांनी टाळला बीडचा दौरा, दिले ‘हे’ कारण

Starlink | डिसेंबर 2022 पासून भारतात सुरू होईल Elon Musk यांच्या ‘स्टारलिंक’ची सेवा, मिळणार हाय-स्पीड इंटरनेट; जाणून घ्या ब्रॉडबँड सर्व्हिसबद्दल