निधनानंतर हि ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत पैसे 

चेन्नई : तामिळनाडू वृत्तसंस्था – तामिळनाडूच्या लोकप्रिय नेत्या म्हणून नाव लौकिक मिळवलेल्या जयललिता यांच्या बँक खात्यात अद्याप हि पैसे जमा होत आहेत. त्यामुळे त्यांची संपत्ती, बँक खाती आणि आयकर संदर्भातील वाद अद्याप संपुष्टात आलेले नाहीत असेच एकंदर चित्र सध्या तरी पाहण्यास मिळते आहे. जय ललिता यांच्या बँक खात्यात दर महिन्याला पैसे जमा होत असून त्यांच्या या खात्याला त्यांच्या वारसाच्या नावे का बदलण्यात आले नाही असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.

आम्हाला प्राप्त झालेल्या माहिती नुसार जयललिता यांच्या खात्यात दर महिन्याला पैसे जमा होतात. जय ललिता यांचे असणारे व्यवसाय आणि त्यांच्या नावे असणाऱ्या अनेक घरांच्या भाड्याची रक्कम नियमित त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. कोडानाड इस्टेटसह अन्य संपत्तीतून हि रक्कम जयललिता यांच्या खात्यात जमा होत आहे असे आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

जय ललिता यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या आयकराची सीमा वाढली असून त्यांचा आयकर भरण्यासाठी कोणीही समोर आले नाही. जयललिता यांच्या संपत्तीच्या आयकराची रक्कम २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांची लाटली आहे अशी माहिती हि आयकर विभागाच्या वतीने समोर करण्यात आली आहे.

आयकराचे १६ कोटी रुपये जमा न केल्यामुळे जयललिता यांच्या प्रसिद्ध पोएस गार्डन या घरा सोबत अन्य चार मालमत्ता २००७ मध्ये ताब्यात घेतल्याचा धक्कादायक खुलासा मागच्या दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या वतीने करण्यात आला होता. तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदावर असताना जयललिता यांचे ५ डिसेंबर २०१६ रोजी रात्री ११. ३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनाला दोन वर्ष उलटून गेली तरी त्यांचे बँक खाते अद्याप हि जिवंत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.