Former CM Manohar Joshi | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक, हिंदुजा हॉस्पिटलने दिली अपडेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांचे विश्वासू सहकारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Former CM Manohar Joshi) यांची तब्येत खालावल्याने त्यांना पी.डी. हिंदुजा रुग्णालयात (P.D. Hinduja Hospital) दाखल करण्यात आले. 22 मे रोजी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. बुधवारी हिंदुजा रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन (Medical Bulletin) जारी करत मनोहर जोशी (Former CM Manohar Joshi) यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.

 

मनोहर जोशी यांच्या प्रकृतीसंबंधित माहिती देण्याकरता हिंदुजा हॉस्पिटलने मेडिकल स्टेटमेंट जारी केले आहे. यानुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Former CM Manohar Joshi) 22 मे रोजी आपत्कालीन परिस्थितीत पी.डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सेमी कोमामध्ये असून त्यांचा श्वासोच्छवास सुरु आहे. तसेच मनोहर जोशी व्हेंटिलेटरवर (Ventilator) नसल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे.

 

रुग्णालयाने म्हटलं की, मनोहर जोशी यांची परिस्थिती चिंताजनक असून ते अर्धवट बेशुद्धवस्थेत (Semi-Comatose) आहेत.
त्यांना आयसीयूमध्येच ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

 

मनोहर जोशी यांचे वय 86 इतकं आहे. मनोहर जोशी यांची शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.
शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला. मुंबईचे महापौरपदही (Mumbai Mayor)
त्यांनी 1976 ते 1977 या काळात भुषवले होते. तर शिवसेना भाजप युतीच्या (Shiv Sena- BJP Alliance) सरकारमध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री होते.

 

 

Web Title :  Former CM Manohar Joshi | manohar joshi health update is critical and semi comatose
his brain haemorrhage is stable he continues to be in icu

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा